आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अावळली एकतेची वज्रमूठ, शिस्त, एकजूट, संयमाचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - मराठाक्रांती महामाेर्चाने शिस्त, एकजूट संयमाचा अादर्श वस्तूपाठ पाडून दिला. लाखाचा जनसमुदाय लाेटलेल्या माेर्चात ना हाेती घाेषणाबाजी ना गाेंधळ. माेर्चासाठी झालेल्या बैठकांमध्ये प्रामुख्याने शिस्त संयम पाळण्याच्या सूचना देण्यात अाल्या हाेत्या. या सूचनांचे पालन झाले.
मानवीसाखळी : माेर्चािशस्तबद्ध पद्धतीने काढण्यासाठी अकाेला क्रिकेट क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यलयादरम्यान मानवी साखळीच तयार करण्यात अाली हाेती. माेर्चाचे नेतृत्व प्रथम युवती, महिला करणार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा स्वयंसेवक तैनात करण्यात अाले हाेते. या स्वंसेवकांनी साखळी तयार करुन माेर्चात गाेंधळ निर्माण हाेऊ दिला नाही. त्यामुळे माेर्चात सहभागी झालेल्या युवती महिलांची गैरसाेय झाली नाही.
रुग्णवाहिकाही सज्ज : माेर्चातरुग्णवाहिकांची व्यवस्था केली हाेती. अकाेला क्रिकेट क्लब मैदान, टाॅवर चाैक, भारतीय स्टेट बॅंकेजवळ, भाटे क्लब येथे रुग्णवािहका सज्ज होत्या. स्वच्छतेवरभर : ठिकठिकाणीपाण्याची व्यवस्था करण्यात अाली हाेती. काही ठिकाणी पाणी पाऊचेही वितरण झाले. पाणी पिपॉल्यानंतर रस्तावर पडलेले पाऊच जमा स्वयंसेवक तैनात करण्यात अाले हाेते.
मैदानावर शाैचालयाची व्यवस्था :
अकाेला क्रिकेट क्लब मैदानावर महानगर पालिका स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी विजय संकल्प फौंडेशनतर्फे महिला पुरुषांकरिता स्थायी शौचालय व्यवस्था केली हाेती.
प्रतिनिधी अकाेला
केवळकाेपर्डी येथील अत्याचार हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी नव्हे, तर अात्मक्लेषासाठी मराठा क्रांती महामाेर्चा काढण्यात अाल्याचे युवकांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेले निवेदनात नमूद केले. अाता पुन्हा काेणत्याच माता-भगिनींची लूट हाेऊ नये, यासाठी सकल मराठा समाजाने वज्रमूठ अावळल्याचे चित्र मुकमाेर्चाच्या निमित्ताने पहावयास मिळाले.
अहमदनगर जिल्ह्यातील काेपर्डी येथील घटनेच्या निषेधासाठी राज्यभर मराठा क्रांती माेर्चे काढण्यात येत अाहेत. अकाेल्यातही क्रांती माेर्चा काढण्यासाठी विविध क्षेत्रातील समाजबांधव-भगीनींनी बैठकीच्या माध्यमातून नियोजन केले होते. मराठवाडा, खांदेशातील बांधव-भगीनींनी मार्गदर्शन केले हाेते. त्यांनी माेर्चाचे नियाेजन, जबाबदारी कशी निश्चित करायची, याबाबत मार्गदर्शन केले हाेते.
१०मुलींनी दिले निवेदन, जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा : माेर्चाप्रसंगीकंचन दिलीप वाघमारे, जयश्री भुईभार, राधिका राऊत, हिमानी भालतिलक, गायत्री राऊत, रिया पागृत, ऋतुंबरा धाेत्रे, अार्या लुंगे, ऋतुजा वाघमारे, दीप्ती यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी रजेवर असल्याने निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण िवधळे यांनी स्वीकारले.
स्टेजलास्वयंसेवकांचे कवच : मराठाक्रांती माेर्चाची सांगता जिजाऊ वंदना राष्ट्रगीताने झाली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर स्टेज तयार करण्यात अाला हाेता. स्टेला स्वयंसेवकांचे कवच हाेते. जिजाऊ वंदना निशिगंधा वाघमारे, नंदिनी देशमुख, अर्चना गायकवाड, वैष्णवी पाटील यांनी म्हटली. निवेदनाचे वाचन सानिका जुमळे हीने केले. कृतज्ञता अनुजा काकड हीने व्यक्त केली. यावेळी स्टेजवर ऊर्जा अावारे, वैदेवी वाघमारे, स्नेहा पाटील उपस्थित हाेत्या.
निवेदनात पुढील बाबी प्रकर्षाने नमूद केल्या अाहेत
Àखटला जलदगती न्यायालयात चालवावा.
Àखटला महिन्यांत संपवून अाराेपींना फाशीची शिक्षा ठाेठावण्यात यावी.
Àअॅट्राेसिटी कायद्याचा बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार पुर्नविचार व्हावा.
Àमराठा समाजासाठी तात्काळ अारक्षण जाहीर करून अंमलबजावणी सुरु करावी.
À स्वामीनाथन अायाेगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी.
}सकल मराठा समाजाने या मुक माेर्चाच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचाराला चले जाव म्हटलं अाहे. राज्यातील प्रत्येक मुलगी, महिला अाता एकटी नाही, तिच्या मागे माझा समाज भक्कमपणे उभा अाहे, असा संदेश माेर्चाने दिला आहे.
}माेर्चाने मराठा बांधवांची जबाबदारी वाढली आहे. हा केवळ निषेध नसून अात्मक्लेष अाहे.
}िशवरायांच्या महाराष्ट्रात माता-भगिनींवर अन्याय, अत्याचार हाेत अाहेत, हे दुदैवी वास्तव बदलले अावश्यक अाहे.
}दिल्लीतील निर्भया अाणि मुंबईतील महिला पत्रकारावरील बलात्काराचे देशभर पडसाद उमटले हाेते. मात्र तेवढी संवेदनशीलता काेपर्डी प्रकरणी दिसली नाही. हे महाराष्ट्राचे दुदैव आहे. महिला संघटनांनी निषेधासाठी एक अाठवडा घेतला, हे अनाकलनीय अाहे. महिला पुराेगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हे प्रकरण गंभीरपणे समजून घेतले नाही.
}काेपर्डी प्रकरणी दाेषाराेप पत्रही सादर झाले नाही. यावरुन शासनाची उदासिनता दिसते. माता-भगिनींची अब्रू वेशीवर टांगली जावू नये, यासाठी पाेिलसांनी वचक िनर्माण करावा.
}हा लढा न्याय हक्काचा अाहे. जातीवाद तर मुळीच नाही. सर्व समाजातील अस्वस्थता, खदखद संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी मराठ्यांनी अावळलेली वज्रमूठ हाेय.
बातम्या आणखी आहेत...