आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मूक माेर्चा; लाखाे हाेणार सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - काेपर्डीयेथील बलात्कार हत्याकांडाचा निषेध करणे, अाराेपींना फाशी द्या, अॅट्राेसिटी कायद्यात बदल सुधारणा करा, मराठा समाजाला तात्काळ अारक्षण लागू करा, या मागण्यासाठी १९ सप्टेंबर राेजी मराठा क्रांती मूक माेर्चा काढण्यात येणार असल्याचा माहिती अायाेजन समितीने शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. समाज बांधव-भगिनींनी एकत्र यावेत, काेणत्याही जातीचा नव्हे तर प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी माेर्चा काढण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. माेर्चात दाेन लाखापेक्षा जास्त बांधव-भगिनी सहभागी हाेण्याची शक्यता अाहे.
मराठा क्रांती माेर्चा काेणत्याही जाती विराेधात नसून व्यवस्थेच्याविराेधात असल्याचे शनिवारी जिल्हा परिषद विश्राम गृहात अायाेजित पत्रकार परिषदेत करण्यात अाले हाेते. अनेक समाजामध्ये प्रस्थापितांविराेधात लढाई देण्यात येत अाहे. माेर्चा साेमवारी सकाळी ११ वाजता अकाेला क्रिकेट क्लब येथून निघणार अाहे. या मुक माेर्चामध्ये घाेषणा अथवा नारेबाजी करण्यात येणार नाही. माेर्चात सहभागी हाेणाऱ्या मराठा समाज बांधव- भगिनींच्या हातात विविध घाेषणा असलेले फलक, भगवे काळे झेंडे राहणार अाहेत. माेर्चात सर्वांत पुढे मुली त्यानंतर महिला, वृद्ध, युवक त्यानंतर पदाधिकारी, नेते राहणार अाहेत, असेही समितीर्फे सांगण्यात अाले.

इतरहीसमाजाचा पाठिंबा : भविष्यातकाेणत्याच समाजातील भगिनीवर अत्याचार हाेणार नाही, यासाठी सर्वांनी एकजूट हाेणे अावश्यक अाहे. मराठा क्रांती माेर्चाला तेली, जैन, माळी, काेळी, पंजाबी, मारवाडी, मुस्लिम साजातील विविध संघटनांसह अनेक समाजांनी पाठिंबा दिल्याचे अायाेजन समितीने सांगितले. त्यामुळे हा माेर्चा एखाद्या समाजािवरुद्ध नाही. अॅट्राेसिटी कायद्याअंतर्गत ९० टक्क्यांपेक्षा जास्त खटल्यांचे काय झाले, याची माहितीच समाेर अालेली नाही. बहुता:श खटले हे शासकीय सेवक लाेकप्रतिनिधींवर दाखल अाहेत.त्यामुळे या काद्याचा गैरवापर टाळणे अावश्यक असल्याचे अायाेजन समितीने सांगितले.
....तर अार्थिक निकषांवर अारक्षण द्या : सर्वचसमाजामध्ये अार्थिकदृष्या कमकुवत अाहेत. त्यामुळे पैशांअभावी त्यांना शैक्षणिक संधीपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र ३० टक्के अारक्षण द्या, अथवा सर्वांनाच केवळ अार्थिक निकषांच्या अाधारे अारक्षण लागू करा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात अाली.

स्थानिकमराठा नेत्यांकडून मदत नाही : जिल्ह्यातीलसत्तेत असलेल्या मराठा लाेकप्रतिनिधींकडून माेर्चासाठी भरीव अार्थिक मदत मिळाली नसल्याची खंत अायाेजन समितीने पत्रकार परिषदेत व्यक्त केली. वाशिम जिल्ह्यात मात्र स्थानिक लाेकप्रतिनिधींनी लाखाे रुपयांची मदत दिली. अकाेल्यात समाजातील अनेक दानशूर, सामन्यांनीही अार्थिक मदत दिल्याचे समितीने सांगितले.
१. अकाेट फैल मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी बाजार समिती.
२. बाळापूर मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी कृषि उत्पन्न गुरे बाजार अावार, गिता नगर, निमवाडी येथील खासगी बस स्टॅंड, पत्रकार भवननजीकचे मैदान.
३. मूर्तिजापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी अारडीजी िवद्या मंदिर परिसर.
४. गुडधी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी तापडीया नगरारातील भारत िवद्यालयासमाेरील छत्रपती शिवाजी महाराज मैदान.
५. शहरातही मध्यवर्ती बस स्थापनकामागे असलेल्या राेकडे मंगल कार्यालय, जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल, चाैधरी हायस्कूल, रतनलाल प्लाॅट चाैकातील मनपा शाळा क्रमांक १५, रामदास पेठ पाेलिस स्टेशनसमाेरील बाबासाहेब खेडकर सभागृह, मनपा शाळा क्रमांक ७, सावित्रीबाई फुले कन्या िवद्यालय, स्टेशन राेडवरील अागारकर िवद्यालय, बार असाेिसएशनचे मैदान, रामदास पेठमधील हाेमगार्ड प्रशिक्षण केंद्र स्व. दादासाहेब िदवेकर िक्रडा संकुल येथे पार्किंगची सुिवधा करण्यात अाली अाहे.

सीसी कॅमेरे, महिला पुरुष स्वयंसेवक
अकाेला क्रिकेट क्लब ते जिल्हाधिकारी कार्यलयादरम्यान काढण्यात अालेल्या माेर्चाच्या मार्गावर सीसीटिव्ही कॅमेरे, लाऊडस्पीकर, वाॅकिटाॅकी, रुग्णवाहिका, अग्निशमन दल सज्ज राहणार अाहे. माेर्चात हजार पुरुष अाणि ५०० महिला स्वयंसेवक राहणार अाहेत. शांततेत माेर्चा पार पडवा यासाठी प्रयत्न केले जात अाहे.

लाख पाणी पाऊच : माेर्चासाठी एकूण २५ समित्या गठित करण्यात अाल्या अाहेत. माेर्चाच्या दिवशी या समितीत्या सक्रिय असल्याचे दिसतील. माेर्चासाठी लाख पाणी पाऊचची व्यवस्था करण्यात अाली अाहे. ठिकठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्थाही केली जाणार अाहे. माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पाेहाेचल्यानंतर मुली निवेदन वाचून दाखवतील.
बातम्या आणखी आहेत...