आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मध्‍यरात्री वाहून गेली कार, अकोल्‍याचे डॉक्‍टर दाम्‍पत्य थोडक्यात वाचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येथून दर्यापूरकडे जाणाऱ्या रस्‍त्‍यावर असलेल्‍या एका नाल्‍याच्‍या पुरात अकोल्‍याच्‍या डॉक्‍टर दाम्‍पत्‍याची कार वाहून गेली. दरम्‍यान, दर्यापूर तालुका प्रशासनाने शर्तीचे प्रयत्‍न करून कारमधील तिघांचे प्राण वाचवले. ही थरारक घटना रविवारी रात्री 1 वाजातच्‍या सुमारास लासूरजवळ घडली.
नेमके काय झाले ?
> अकोला येथील हृदयरोगतज्‍ज्ञ डॉ. सुरेश मुंदडा, त्‍यांच्‍या पत्‍नी डॉ. पुष्‍पा आणि चालक संजय गुल्‍हाने हे तिघेजण रविवारी रात्री दर्यापूरकडे जात होते.
> चालकाला ओढ्याच्‍या पाण्‍याचा अंदाज आला नाही. त्‍यामुळे त्‍याने पुलावरून गाडी नेण्‍याचे धाडस केले.
> परंतु, ओढ्याच्‍या पुरात त्‍यांची कार वाहत गेली.
असे वाचले प्राण
> मुंदडा यांची कार ओढ्याच्‍या मध्‍यभागी असलेल्‍या एका झाडाला अडकली.
> याच वेळी मुंदडा यांनी फोनवरून गृहराज्‍य मंत्री डॉ. रणजित पाटील यांना कॉल करून मदत मागितली.
> डॉ. पाटील यांनी तत्‍काळ अमरावती जिल्‍हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
> दर्यापूरचे तहसीलदार, ठाणेदार आणि जिल्‍हा आपत्‍ती निवारण कक्षाच्‍या पथकाने रात्री दोन वाजता घटनास्‍थळ गाठले.
> शर्तीचे प्रयत्‍न करून स्पीड बोटीच्‍या मदतीने कारमध्‍ये अडकलेल्‍यांना डॉक्‍टर दाम्‍पत्‍यासह त्‍यांच्‍या चालकाला बाहेर काढले.
> यासाठी स्‍थानिक नागरिक पवन मेश्रे यांनीसुद्धा सहकार्य केले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, बचाव कार्याचे फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)