आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alone Man Dug Wells For Drinking Water At Kalambeshwar Dist Washim

या \'शहाजहान\'ने पाषाणाला फोडला पाझर, पत्‍नीसाठी एकट्याने खोदली विहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विहीर खोदताना बापूराव ताजणे - Divya Marathi
विहीर खोदताना बापूराव ताजणे
वाशीम - हंडाभर पाणी भरण्‍यास गेलेल्‍या आपल्‍या पत्‍नीला विहीर मालकाने हाकलून दिले. याचा राग मनात घेऊन त्‍याने एकट्याने एका महिन्‍यात विहीर खोदली. या आधुनिक 'शहाजहान'ने केवळ आपल्‍या पत्‍नीला पाण्‍याचीच भेट दिली नाही तर माणुसकीचा दुष्‍काळ असलेल्‍या आपल्‍या गावातील पाणी नकारणाऱ्या 'त्‍या' विहीर मालकाच्‍या पाषाण हृदयालाही पाझर फोडला. बापूराव ताजणे (रा. कळंबेश्वर, ता. मालेगाव) असे त्‍या युवकाचे नाव आहे.
नेमके काय झाले होते...
> उन्‍हाळ्याबरोबर कळंबेश्वर येथे जलसंकट उभे राहिले.
> पाण्‍याच्‍या शोधात ग्रामस्‍थांना वणवण भटकंती करण्‍याची वेळ आली.
> बापूराव ताजणे यांच्‍या पत्‍नी संगीतासुद्धा पाण्‍याच्‍या शोधात एका शेतातील विहिरीवर गेल्‍या.
> मात्र, त्या विहीर मालकाने पाणी देण्यास नकार दिला. 'मलेच नाही पुरत त तुमाले काऊन देऊ?' असा सवाल केला.
> बापूरावच्या बायकोला तो अद्वातद्वा बोलला.
> तिच्या डोळ्यातून मूकपणे अश्रू कोरड्या जमिनीवर टपटपले.
> एवढचे नाही तर त्‍या विहीर मालकाने त्‍यांचे भांडे फेकून दिले आणि त्‍यांना शेतातून हाकलून दिले.
> पत्‍नीने घरी येऊन रडत रडत बापुराव यांना हा प्रकार सांगितला.
> बापूराव यांना याचा खूप राग आला.
> कुदळ आणि फावडे घेऊन ते घरामागे गेले.
> आणि त्‍यांनी त्‍या क्षणीच विहीर खोदायला सुरुवात केली.
विहीर सर्वांसाठी खुली
> बापूराव सांगतात, ही विहीर केवळ आमच्‍या मालकीची नाही.
> त्‍यावर गावातील समस्‍त जाती-धर्माचे लोक पाणी भरू शकतात.
> ती सर्वांसाठी खुली आहे.

अशी आहे विहीर

> सध्या या विहिरीत अर्ध्या तासात 200 लिटर पाणी येते
> हा उपसा संपताच पुन्हा बापुराव विहिरीत उतरून खोदकामाला सुरुवात करतात.
> ही विहीर 15 फूट झाली असून, बापूराव अजून 20 फूट खोल खोदकाम करणार आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, ग्रामस्‍थांनी काढले होते वेड्यात....