आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असहकारामुळे बाजार समिती बंद, आवकच नसल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - फळेभाजीपाल्याची थेट विक्री करण्याची मुभा देण्याच्या निर्णयाविरोधात येथील व्यापाऱ्यांनी असहकार पुकारल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार शनिवारपासून ठप्प झाला आहे. दुसरीकडे या काळात आवक नसण्याचे दरवर्षीचेच चित्र असल्याने सदर आंदोलनाचा दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही, असे बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज अंदाजे दोन हजार क्विंटल धान्य विक्रीस आणले जाते. परंतु, व्यापाऱ्यांच्या असहकारामुळे शेतकऱ्यांनी आज, सोमवारी बाजार समितीच्या प्रांगणात कोणताही शेतमाल विक्रीसाठी आणला नाही. सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने शेतकरी तसाही शेतीच्या कामात गुंतला आहे. परिणामी, बाजार समितीत माल आणण्यासाठी त्याला वेळच नाही, असे एकूण चित्र आहे.

शेतमालाच्या विपणन व्यवस्थेत स्पर्धा निर्माण करण्याच्या हेतूने शासनाने बाजार समिती कायद्यात सुधारणा केली आहे. शेतमाल विक्रेते, शेतकरी, शेतकरी गट थेट पणन परवानाधारक यांच्या सहकार्याने फळे भाजीपाला उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या सुधारणांना विरोध दर्शवत व्यापाऱ्यांनी असहकार पुकारला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शेतमालाची खरेदी-विक्री व्यवस्था बाधित होण्याची शक्यता असून, ग्राहकांना फळे भाजीपाला उपलब्ध होण्यामध्ये काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात, हे शासनाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी, ग्राहक किरकोळ विक्रेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

धान्य व्यापाऱ्यांनी दिले पत्र : शासनाच्यासुधारणांना विरोध दर्शवण्यासाठी धान्य व्यापाऱ्यांनी बाजार समितीला पत्र दिले आहे. शासनाच्या लेखी या सुधारणा असल्या तरी त्या आमच्या मुळावर घाव घालणाऱ्या आहेत. त्यामुळे आधीचीच व्यवस्था सुरू ठेवली जावी, असे ग्रेन मर्चंट असोसिएशनच्या पत्रात म्हटले आहे. या संदर्भात येत्या १४ जुलैला एक बैठकही बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे बाजार समिती संघानेही आज पुण्यात बैठक घेतली.
तोडगा काढणे गरजेचे
^नेहमीच्या अनुभवानुसार राखून ठेवलेली तूर, हरभरा सोयाबीनच या वेळी विक्रीसाठी आणले जाते. परंतु, बंद राज्यव्यापी असल्याने यापैकी कोणतेही धान्य शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणले नाही. शासनाने लवकरात लवकर तोडगा काढून ही स्थिती निवळली पाहिजे.'' विजय मालोकार, सचिव, कृउबास
बातम्या आणखी आहेत...