आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनी दिला अधिकाऱ्याला चोप, कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कृषीउत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी एका अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. संबंधित अधिकाऱ्याचा बचाव करण्यासाठी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून प्रकरण आपसात मिटवले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या शाखेच्या एका अधिकाऱ्यासोबत शिवापूर येथील एका शेतकऱ्याचा वाद झाला. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने त्या अधिकाऱ्यास इतर शेतकऱ्यांनीसुद्धा चांगलाच चोप दिला. प्रकरणाची वार्ता बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना लागल्याने त्यांनी मध्यस्थी करत प्रकरण आपसात मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी बोलण्याचे टाळले.
बातम्या आणखी आहेत...