आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीचा सभापती अाता थेट शेतकरी निवडणार : सदाभाऊ खोत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कारभारात शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा म्हणुन राज्य सरकार बाजार समिती कायद्यात बदल करणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणूकीत मतदानाचा थेट अधिकार शेतकऱ्यांना मिळणार आहे. संचालक, सरपंच, सचिव यांच्याऐवजी सभापतींची निवड शेतकऱ्यांच्या मतदानातून करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मतदानामुळे त्यांना या व्यवस्थेत मोठे स्थान मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे कृषी, पणन पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज व्यक्त केला. 

बुलडाणा तालुक्यातील सावळा येथे ग्रामस्थ कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आमदार धृपदराव सावळे, माजी आ. विजयराज शिंदे, जि.प सदस्या सविता बाहेकर, पं.स. उपसभापती कविताताई लहासे, सरपंच शीतल नरवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्यासह कृषी, पाणीपुरवठा स्वच्छता, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, आत्मा यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी खोत म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आधी कळावा त्यासाठी महसूल मंडळ स्तरावर लवकरच स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने जागतिक निविदा काढून कंपन्यांना कंत्राट दिली आहेत. तसेच बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भातील खारपाणपट्टा, मराठवाड्यातील अवर्षणग्रस्त जिल्हे यांमधील चार हजार गावांकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची सुरूवात शासनाने केली आहे. 

या गावांमध्ये कृषी विकासासह शुद्ध पाण्याचा पुरवठा केल्या जाणार आहे. राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर शासनाने भर दिला आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल ठेवण्यासाठी वेअर हाऊसच्या निर्मिती करण्यात येणार आहे. अशा कंपन्यांना ७५ टक्के कर्ज बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचे व्याज शासन भरणार आहे. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले. तसेच दत्ता खरात, जि. प. अध्यक्षा उमाताई तायडे, धृपदराव सावळे, गजानन अहमदाबादकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

शेतमजुराच्या मुलीच्या लग्नाकरता दहा हजार 
याप्रसंगीप्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. सावळा गावातील ५० शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीची आरोग्य पत्रिका काढली आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा योजनेंतर्गत विविध योजनांचे धनादेश वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले. विविध कृषी विभागांच्या योजनांमध्ये चांगले काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सावळा येथील शेतमजूर महिला संगीता रामदास फुलमाळी यांना मुलीच्या लग्नासाठी दहा हजार रूपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन चंद्रशेखर जोशी यांनी केले. 

नूतन प्रमोद यांचा सत्कार 
चिंचपूरता.मोताळा येथील नुतन विष्णु धोरण या मुलीने आईकडे हट्ट धरून शौचालय बांधकाम करून घेतले. यासाठी नूतनच्या आईने मंगळसूत्र विकले. हगणदारीमुक्तीला प्रेरक असलेल्या नुतनचा यावेळी तिच्या आई वडिलांसह सत्कार करण्यात आला. खैरा तालुका नांदुरा येथील प्रमोद मनोहर वाघ या सलून व्यावसायिकाने शौचालय बांधलेल्या गावातील पुरूषांची दाढी-कटींग वर्षभर मोफत करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 

गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प 
याप्रसंगीवस्त्रोद्याेग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की, सावळा गावाला नेहमी पाणीटंचाई भासते. गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार येथील पाणीटंचाई कायम असते. मात्र गावाजवळ रिचार्ज शाफ्ट, सिमेंट नाला बांध घेण्यात आले. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. यावेळी त्यांनी गावकऱ्यांनी गावाला शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. 
बातम्या आणखी आहेत...