आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनालीने घेतला गळफास, पतीला काळजीचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सिव्हिल लाइन्स अंतर्गत येत असलेल्या खेडकरनगरमधील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ११.४५ वाजता उघडकीस आली. सोनाली आनंद मसने (वय २७) या पतीसह खेडकर नगरातील संत तुकाराम संकुलमध्ये राहतात. त्यांना एक मुलगा आहे. सोनाली यांनी घरात छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.
 
त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांना एक चिठ्ठी आढळून आली. त्यात सोनाली यांनी पतीला चांगल्या स्वभावाचे संबोधून लिहून ठेवले की, तुम्ही मोकळ्या मनाचे आहात, मला तुमची काळजी वाटते. तुम्ही लोकांवर विश्वास करू नका. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून, आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
बातम्या आणखी आहेत...