आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून हत्याकांड; आई, मामासह भाऊ मारेकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर - पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विवरा परिसरात मळसूर येथील कविता पटेल या ३० वर्षीय महिलेची हत्या अनैैतिक संबंधातून घडल्याने पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. दरम्यान, हे हत्याकांड कविता पटेल हिची आई, भाऊ, मामा, चुलतभाऊ भावाचा मित्र या पाच जणांनी घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले. पाचही आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
 
विवरा परिसरात मळसुर येथील कविता जितेश पटेल (३० ) या महिलेचा मृतदेह मंगळवारी दुपारी आढळून आला. या हत्याकांडाचा तपास लावण्यात पोलिसाना यश आले असून, कविताची आई गिरजाबाई पारस्कर, मामा दयाराम बुंदे, भाऊ राहुल पारस्कर, चुलतभाऊ श्रीकृष्ण पारस्कर, राहुलचा मित्र अय्युब बेग यांनी संगनमत करून हे हत्याकांड घडवल्याचे चौकशीत समोर आले. कविताचे वाडेगावातील व्यापारी रवी पाटील सरप यांच्याशी अनैतिक संबंध होते. काही महिन्यांपासून त्यांच्यातील संबंध वाढतच गेले. कविता ही वाडेगावातील रवी पाटील यांच्या घरी गेली होती. त्या वेळी वादंग झाला होता. या नंतर कविताने चान्नी ठाण्यात शारीरीक शोषण होत असल्याची तक्रार केली होती. पंरतु, यावर कारवाई केली नाही, यानंतर हे प्रकरण काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनेे मिटवले. यात कविताला साडेचार लाख दिले. या बदल्यात कविताने रवी पाटील यांच्याशी असलेले संबंध तोडावे, असे ठरले. त्याबाबत एक नोटरीही केली.

परंतु, यानंतरही कविता रवी पाटील यांच्यातील अनैतिक संबंध कायम होते. यामुळे घरचे वैतागले होते अशी माहिती समोर आली. कविताचे रवी पाटील यांच्याशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे परिवाराची बदनामी होत आहे कविताला मिळालेले साडेचार लाख आपल्याजवळ राहतील या उद्देशाने कविताचा काटा काढावा या उद्देशाने मंगळवारी कविताला कायमचे संपवण्याचा प्लॅन केला. यानुसार कविताला मिळालेल्या पैशात तिला प्लाॅट घ्यायचा असल्याने प्लाॅट दाखवण्याच्या बहान्याने कविताचा मामा दयाराम बुंदे, भाऊ राहुल पारस्कर, चुलतभाऊ श्रीकृष्ण पारस्कर राहुलचा सायवणी येथील मित्र अयुब बेग यांनी मंगळवारी रात्री ९.३० च्या दरम्यान कविताला दुचाकीवर बसवून विवरा शेत शिवारत आणले. तिथे थांबवून कविताचा दोरीने गळा आवळून हत्या केली. यानंतर संशय येऊ नये म्हणून चान्नी पोलिसात कविता हरवल्याची मंगळवारी तक्रार केली. या प्रकरणी चौकशीकरिता कविताची आई, भाऊ मामा यांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतल्यानंतर पहिले पोलिसांची दिशाभूल करण्याऱ्या या तिघांना पोलिसी खाक्या दाखवताच घडलेल्या हत्याकांडाची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी सरकारतर्फे एपीआय प्रकाश झोडगे यांनी फिर्याद केली. संशयित आरोपी गिरजा पारस्कर, दयराम बुंदे, राहुल पारस्कर, श्रीकृष्ण पारस्कर,अय्युब बेग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक केली.
 
मृतक महिलेच्या तक्रारीबाबत चौकशी होणार
याप्रकरणी आणखी आरोपींची वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पुढील तपास पोलिस करत आहेत. कविता ही शारीरीक शोषणाची तक्रार देण्यासाठी चान्नी ठाण्याात गेली होती. त्यावेळी या तक्रारीची दखल घेतली गेली असती तर पुढील अनर्थ टळला असता, अशी चर्चा सुरू आहे. चान्नी पोलिसात कविताने शारीरीक शोषणाची तक्रार दिली होती काय. त्याचीही चौकशी करणार असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...