आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिंदखेडराजात मशाल यात्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी सुमारे ४१८ मशालींची यात्रा काढण्यात आली. या वेळी राजे लखुजीराव जाधव यांच्या ऐतिहासिक राजवाडा परिसरावर सर्वत्र लखलखाट पसरला होता. विद्युत रोषणाईसह जन्मस्थळाच्या ठिकाणी रंगरंगोटी करून भव्य रांगोळी काढण्यात आली होती. या वेळी जिजाऊंच्या वेशभूषेत मोठ्या प्रमाणात महिला जमल्या होत्या.