आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभाविपचे विद्यार्थ्यांसाठी 'मे आय हेल्प यू' अभियान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- महाविद्यालय प्रवेशाचे सत्र सुरू झाले असताना अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तालुकास्तरावर "मे आय हेल्प यू' राबवले असून, विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासह विविध क्षेत्राची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दहावी, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना अल्प माहितीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. तसेच काही समस्या प्रवेशाबाबत असतात. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मूर्तिजापूर तालुक्यात मार्गदर्शक डॉ. राजू बोरकर यांच्या आदेशानुसार "मे आय हेल्प यू' अभियान राबवून अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावण्यात आल्या. कोणत्याही क्षेत्राची माहिती, प्रवेशात अडचणी किंवा तक्रार असल्यास नगरमंत्री शुभम अवताडे नगरमंत्री मनीष फाटे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यार्थी परिषदेने केले आहे. हेल्पलाइन क्रमांक म्हणून ७७७४९२२०८६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

२१ वृक्षांच्या रोपणासह संवर्धनाची हमी
विद्यार्थी परिषदेअंतर्गत अनेक विद्यार्थी एकत्र येऊन शहरात २१ झाडांचे रोपण करणार आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी कार्य करून ही झाडे अखेरपर्यंत जगवण्याची हमी घेतली आहे.

विद्यार्थी करणार स्टिकर लावून आवाहन
विद्यार्थी परिषदेअंतर्गत विद्यार्थी शहरात वर्दळीच्या ठिकाणी पोस्टर, स्टिकर लावून वृक्षारोपण संवर्धनासह एक झाड दत्तक घेण्याचे आवाहनही करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...