आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांनी व्यक्त केली प्रशासनाप्रति नाराजी, कोणतीही कार्यवाही न केल्याने लेखी तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या अनुषंगानेच शहराचा संपूर्ण विकास आणि नियोजन करण्यासाठी शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला. हा ठराव मंजूर होऊन चार महिने होत आले असताना प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केल्याने महापौर उज्ज्वला देशमुख यांनी प्रशासनाकडे लेखी स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात महापौरांनी म्हटले आहे की, भविष्यातील बाबी लक्षात घेऊन शहराच्या विकासाचे धोरण निश्चित करावे, यासाठी शहर विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. काही कामे निधीअभावी तर अनेक कामे तांत्रिक अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे तसेच अनुभव लक्षात घेता, शहराचा संपूर्ण विकास आराखडा तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय जानेवारी २०१६ रोजी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर होऊन चार महिने होत आले आहेत. परंतु, प्रशासनाने शहर विकास आराखडा (सीडीपी) तयार करण्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन तातडीने तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करावी, असे स्पष्ट करून कार्यवाहीस विलंब झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.