आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला मंजूरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - पातूर तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान बांधण्याच्या ठरावाला मंजूरी देण्याचा शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अाराेग्य समितीच्या सभेत घेतला.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अाराेग्य समितीची सभापती जमीरउल्ला खान यांच्या कक्षात १४ अाॅक्टाेबर राेजी सभा अायाेजित करण्यात अाली हाेती. सभेत १४ सप्टेंबर राेजी पार पडलेल्या सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात अाली. सभेत अाकाेट तालुक्यातील चंडीकापूर येथील प्राथिमक अाराेग्य केंद्राच्या शिकस्त झालेल्या इमारतीच्या मुद्यावर चर्चा झाली. इमारतीचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासणी करण्यात येईल, असे जिल्हा अाराेग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर शिकस्त इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची सूचना सभापतींनी दिली.
सभेत सन २०१६-१७मध्ये राबवण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक याेजना अादीवासी उपाय याेजनेबाबत चर्चा झाली. समितीच्या सदस्यांनी कार्यक्षेत्रात प्राथमिक अाराेग्य केंद्र, उपकेंद्रांची बांधकामे सुचवण्यात यावे, असे सभापतींनी सांगितले. सभेला विराेधी पक्ष नेते रमण जैन, गिता राठाेड, विजय लव्हाळे उपस्थित हाेते. सभेला सदस्य तथा शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख नितीन देशमुख उपस्थित नव्हते. सध्या पक्ष बांधणीसाठी ते ग्रामीण भागाचा दाैरा करीत अाहेत.

अाढाव्याचे झाले वाचन : जिल्हापरिषदेच्या अाराेग्य समितीच्या सभेत विविध राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अाढाव्याचे वाचन करण्यात अाले. सुधािरत राष्ट्रीय क्षयराेग नियंत्रण कार्यक्रमाबाबत मािसक प्रगदतीपर झालेल्या कार्याची मािहती देण्यात अाली. राष्ट्रीय किटकजन्य कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात अालेल्या रक्त नमुने अािण प्राथमिक अाराेग्यनिहाय अाढळून अालल्या दुिषत रुग्णांची मािहती सभेत सादर करण्यात अाली. साथराेगाबाबतची मािहती मािहती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सभेत दिली.

हे झाले निर्णय : अाराेग्यसमितीच्या सभेत पातूर तालुक्यातील बाभुळगाव, धाेत्रासह तीन प्राथमिक अाराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात अाली. जिल्ह्यातील जवळपास प्राथमिक अाराेग्य केंद्रांसाठी अग्निशमन यंत्र खरेदीचा निर्णय घेण्यात अाला. तसेच यंत्र दुरुस्ती अािण नुतणीकरणाचाही ठराव मंजूर करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...