आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईमध्ये औषध प्रशासन विभागाने मारली ‘बाजी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अन्नऔषध प्रशासन विभागाने सात मेडिकलचे परवाने कायमस्वरूपी बंद केले तर ४७ मेडिकल दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. त्याचप्रमाणे या विभागाने औषधांच्या आक्षेपार्ह जाहिराती केल्याबाबत सात इलेक्ट्राॅनिक वाहिन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. मनुष्यबळ कमी असताना औषध प्रशासनाची कामगिरी विभागात नंबर वन आहे.
अन्न औषध प्रशासन विभागाचे कार्यक्षेत्र अकोला वाशीम जिल्हा आहे. या दोन जिल्ह्यासाठी अत्यंत अपुरे मनुष्यबळ येथे आहे. औषध विभागात मंजूर पदे चार आहेत. पैकी दोन पदे भरण्यात आलेली आहेत. सध्या या विभागाला सहायक औषध प्रशासन सहायक आयुक्त म्हणून पाटील औषध निरीक्षक म्हणून अस्वार कार्यरत आहेत. दोन्ही जिल्हा मिळून १७०० मेडिकल दुकाने आहेत. त्यांची नियमित तपासणी आणि तक्रारीवरून कारवाया करण्यात अत्यंत अडचणी असताना या विभागाने अपुऱ्या मनुष्यबळात भरीव कामगिरी केली आहे. जिल्ह्यामध्ये अॅलोपॅथिक औषध उत्पादक कंपन्याची संख्या तीन अाहे. त्यातील दोन बंद पडल्या आहेत. त्यांचीही नियमित तपासणी या विभागाकडून होत असते. नियमित तक्रारींच्या अनुषंगाने ९७ औषध नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी १४ औषध नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले दोन औषध उत्पादकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील २३९ मेडिकलची तपासणी करून ४७ औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. सहायक औषध आयुक्त पाटील यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक प्र. भा. अस्वार यांनी कारवाई केली आहे.

आठटीव्ही चॅनल्सला कारणे दाखवा नोटीस : जादूटोणाऔषधांच्या आक्षेपार्ह जाहिराती दाखवणाऱ्या टीव्ही चॅनलच्या मुख्य व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यापैकी पाच चॅनल्सनी अशा जाहिरातींचे प्रक्षेपण बंद केले आहे. त्यात डिस्ने एक्स् डी चॅनल, बिनधास्त टीव्ही, बिग मॅझिक टीव्हीचा समावेश आहे तसेच धम्माल यूटीव्ही अॅक्शनला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
तक्रारीवरून नियमित कारवाई करतो
^मनुष्यबळ जरी कमी असले तरी आम्ही आहे त्या परिस्थितीत कारवाया करतो. कार्यक्षेत्र दोन जिल्ह्यांचे असल्यामुळे अनेक अडचणी येतात. मात्र, अशाही परिस्थितीत आमच्या कारवाया सर्वाधिक आहेत. तक्रारीवरून तसेच नियमित कारवाई सुरू आहेत. माहिती असल्यास आम्हाला द्यावी, आम्ही कारवाई करू.'' आर.एल. पाटील, सहायक आयुक्त

पाच औषधी दुकानांवर कारवाई
विनापरवाना औषधांची खरेदी, विक्री साठवणूक केल्याप्रकरणी पाच विनापरवाना दुकानांची जप्ती केली असून, त्यांच्याकडून लाख ३३ हजार २४ रुपये किमतीचा साठा जप्त केला. त्यात प्रवीण चोपडे रिधोरा, प्रांजली जयस्वाल आगर, नीलेश वानखडे, रेल, लक्ष्मण काळे, मानेकनगर, गुरमितसिंग सेठी, वाशीम यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...