आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची अंदाजपत्रकाची सभा नियमबाह्यरीत्या स्थगित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अंदाजपत्रकाची सोमवारी होणारी सभा नियमबाह्यरीत्या पुढे ढकलण्यात आली आहे. रविवारी नगर सचिव विभागाच्या वतीने याबाबत नगरसेवकांना तोंडी माहिती देण्यात आली. आता ही सभा १८ एप्रिलला होत आहे. अंदाजपत्रकाची सभा पुढे ढकलण्यात आल्याने प्रशासनाला अडचण जात असतानाच महापालिका अधिनियमांचीही पायमल्ली सत्ताधारी गटाकडून झाली आहे.
प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठवलेल्या २०१६-२०१७ च्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीत १८ मार्चला चर्चा करण्यात आली. स्थायी समितीने यात विविध बदल सुचवले. स्थायी समितीने सुचवलेल्या बदलांसह हे अंदाजपत्रक महासभेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आले. चालू आर्थिक वर्षात कामकाज करताना अंदाजपत्रकाला मंजुरी मिळणे गरजेचे आहे. यामुळे प्रशासनाला वेतन आणि विद्युत देयकांसह अत्यावश्यक असलेली देयके देता येणार आहेत. सत्ताधारी गटाने ११ एप्रिलला अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी सभा बोलावली होती. नगरसेवकांना सभेची माहिती देण्यात आली. परंतु, रविवारी नगर सचिव विभागाच्या वतीने नगरसेवकांना मोबाइलवर महापौरांची प्रकृती बिघडल्याने ही सभा स्थगित करून १८ एप्रिलला होत असल्याची माहिती देण्यात आली. सोमवारी सभा घेता, परस्पर सभा पुढे ढकलण्याबाबत विरोधी पक्षातील नगरसेवकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नियमानुसार अशी तोंडी माहिती देऊन सभा पुढे ढकलता येत नाही, तसेच तहकूब किंवा स्थगित करता येत नाही. त्यामुळेच तोंडी आदेश देऊन सभा पुढे ढकलल्याबाबत आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. कोणतीही सभा तहकूब, रद्द किंवा पुढे ढकलण्यासाठी नियोजित तारखेला सभा घेऊनच ही सभा तहकूब करता येते. महापालिका अधिनियमानुसार नियोजित तारखेच्या सभेला महापौर उपस्थित राहू शकणार नसतील, तर उपमहापौर पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहू शकतात. तसेच उपमहापौरही सभेला उपस्थित राहू शकत नसतील, तर ज्येष्ठ नगरसेवकांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करून सभा सुरू करून तहकूब करता येते. तसेच गणपूर्तीअभावी सभा तहकूब होऊ शकते. परंतु, सभाच घेता, परस्पर सभा पुढे ढकलता येत नाही. यामुळेच १८ एप्रिलला होणाऱ्या सभेत या विषयावर विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार
^सभातहकूब किंवा पुढे ढकलण्यास आमचा विरोध नाही. परंतु, चुकीच्या पद्धतीने सभा पुढे ढकलणे ही बाब नियमबाह्य आहे.याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली जाईल. '' राजकुमार मूलचंदानी, गटनेता,राष्ट्रवादी काँग्रेस.

नियमांची पायमल्ली
^सत्ताधारी गट सातत्याने नियम आणि कायद्याची पायमल्ली करत आहे. यापूर्वीही मनमानी पद्धतीने सभेचे कामकाज केल्या गेले. आताही तोंडी माहिती देऊन सभा पुढे ढकलण्यात आली. ही सर्वथा चुकीची बाब आहे. सत्ताधारी गटाला सभा तहकूब करण्यासाठी सभा घेणे गरजेचे होते. '' गजानन गवई, गटनेते,भारिप-बमसं

नगरसचिव म्हणतात, नियमात बसते
^सभापुढे ढकलण्यात आल्याची माहिती रविवारी नगरसचिव विभागाकडून कळली. या अनुषंगाने सभा अशाप्रकारे तहकूब करता येते का? याबाबत नगर सचिवांना जाब विचारला असता नियोजित तारखेच्या २४ तास आधी सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिल्याने सभा पुढे ढकलता येते, अशी माहिती दिली. '' विनोद मापारी, उपमहापौर

चुकीची पद्धत
^अंदाजपत्रकाची सभातोंडी माहिती देऊन पुढे ढकलता येत नाही. यासाठी सभा घेणे गरजेचे आहे. सत्ताधारी गट अधिनियमांना बाजूला ठेवून चुकीची पद्धत अमलात आणत आहे, असा प्रकार वारंवार होत असेल, तर अधिनियमांची गरज काय? त्यामुळेच याचा जाब पुढे होणाऱ्या महासभेत सत्ताधारी गटाला विचारला जाईल.'' रफिक सिद्दीकी, माजीउपमहापौर

कायद्यासोबत खेळ
^अंदाजपत्रकाची सभा तहकूब किंवा रद्द करता येत नाही. तसेच सभा सुरू करून सभागृहात तहकूब करण्याचे ठोस कारण स्पष्ट करणे गरजेचे आहे. कारण अंदाजपत्रकाची सभा वर्षाची असते. सात दिवसांअगोदर अजेंडा दिला जातो. त्यामुळे परस्पर सभा पुढे ढकलणे म्हणजे कायद्यासोबत खेळ आह'' सुनील मेश्राम, ज्येष्ठनगरसेवक