आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्याकांडाचा गुंता अाता लवकरच सुटणार, एमअायडीसी परिसरातील गाेळीबार प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एमअायडीसी परिसरात झालेल्या गाेळीबार प्रकरणाचा गुंता लवकरच सुटण्याची शक्यता अाहे. संताेष घनश्याम शर्मा (वय ३२, रा. शिवणी) या मशीन अाॅपरेटरची मंगळवारी हत्या करण्यात अाली हाेती.

संताेष शर्मा हे एमअायडीसी परिसरातील श्रीहरी दालमिलमध्ये मशीन अाॅपरेटर म्हणून काम करत हाेते. मंगळवारी रात्री अाठ वाजताची शिफ्ट संपल्यानंतर ते एमएच-३०-झेड-३२९४ या क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे निघाले.

रुंगठा टायर वर्क्सजवळ त्यांच्यावर हल्लेखोरांनी गाेळीबार केला हाेता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला हाेता. याबाबत पाेलिस तपास करत अाहे.

संशयितांची कसून चाैकशी सुरू
गाेळीबार प्रकरणात पाेलिसांनी तीन ते चार संशयितांची कसून चाैकशी केली. हत्याकांडाशी निगडित असलेल्या नातेवाइकांकडूनही माहिती संकलित केली. चाैकशी प्राप्त झालेल्या माहितीच्या अाधारे पाेलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली असून, अाता लवकरच पाेलिस अाराेपींपर्यंत पाेहाेचणार असल्याचा दावा सूत्रांनी केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...