आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन बाइकर्सची धूम स्टाइल "बेलगाम'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - शहरामध्ये अल्पवयीन मुले मुली दररोज धूम स्टाइलने दुचाकी दामटत अाहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून, या प्रकाराकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात दररोज सकाळी शिकवणी वर्ग सुरू होतात. त्यामुळे सकाळी पासूनच इयत्ता दहावी बारावीमधील विद्यार्थी ट्युशन क्लासनिमित्त घराबाहेर पडतात. शहराच्या विविध भागांत गणित, इंग्रजी विज्ञान या विषयांचे शिकवणी वर्ग जोरात सुरू असून, जवळपास दोन हजार विद्यार्थी या वर्गासाठी जातात. शिकवणीला जाण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांजवळ दुचाकी आहेत. सकाळच्या सुमारास घराबाहेर पडणारा विद्यार्थी त्यांचे पालक झोपेत असतानाच दुचाकी वाहने घेऊन शिकवणी वर्गासाठी जातात. त्यामुळे आपला पाल्य दुचाकी कशाप्रकारे चालवतो याविषयी पालक अंधारातच असतात, तर काही पालकांचा दुचाकी चालवण्यास पाठिंबा असल्याचेही दिसून येते. शिकवणी वर्ग घरापासून दूर वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने काही पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी दुचाकी खरेदी करून दिली आहे. सायकलने शिकवणी क्लासला जाणे अशक्य होत असून, त्याचा परिणाम अभ्यासावर होत असल्याने दुचाकीने शिकवणीला गेल्यास चुकीचे काय, अशी पालकांची भूमिका आहे. मात्र, ही मुले शिकवणीला जाताना शिकवणी वर्ग सुटल्यावर दुचाकी वेगाने चालवण्याच्या शर्यती लावतात. वेगाने दुचाकी अन्य वाहने चालवल्यामुळे नियंत्रण सुटून या मुलांच्या अन्य नागरिकांच्या जीवावर बेतू शकते, याची कल्पना या मुलांसह त्यांच्या पालकांनाही नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मुलांना दुचाकी वाहने चालवण्यासाठी देताना पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

तोंडाला स्कार्फ बांधून सुसाट ड्रायव्हिंग : शिकवणीवर्गाला जाणाऱ्या मुली तोंडाला स्कार्फ बांधून सुसाटपणे ड्रायव्हिंग करताना दिसून येतात. तसेच दोन ते तीन मुली अापापल्या दुचाकीवरून आपसात बोलत जात संपूर्ण रस्ताच अडवून ठेवतात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो.

मुलींनी गाड्या हळू चालवाव्या : शिकवणीलाजातानाच नाही, तर अन्य वेळीही मुलींनी दुचाकी चालवताना नियमांचे पालन करायला हवे. तसेच आपले वाहन अनियंत्रित होऊन आपल्यासह इतरांना दुखापत होणार नाही याची काळजी घेत वाहने हळू चालवावे, असे मत प्रा. माया म्हैसने यांनी व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी आरटीओने कॅम्प घ्यावा
^१६ वर्षेपूर्ण झालेल्यांना विनागीअरच्या गाडीचा परवाना मिळतो. मात्र, या मुलांना वाहतुकीच्या नियमांचे काहीही सोयरसुतक नसते. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी आरटीओने कॅम्पचे आयोजन करून नियमाबांबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.'' राजेश जोशी, पालक,अकोट.
अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देऊ नये

^अल्पवयीनमुलांना पालकांनी दुचाकी वाहने चालवण्यास देऊ नये. वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असून, पोलिसांकडूनही परवाना तपासणी नियमित करण्यात येत असते.'' कैलासनागरे, शहरपोलिस निरीक्षक, अकोट.
बातम्या आणखी आहेत...