आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीने दाखवले अब्रू वाचवण्यासाठी धाडस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - नराधमाने भुलथापा देऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अल्पवयीन मुलीने प्रसंगावधान दाखवत स्वत:ची अब्रू वाचवली. असाधारण सहन शक्तीचे प्रदर्शन करत तिने पऱ्हाटीच्या शेतात संपूर्ण रात्रच हातात दगड घेऊन जागून काढल्याची माहिती आज समोर आली.

अंजनगाव तालुक्यातील पांढरी येथे शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या सख्ख्या मामाने भुलथापा देऊन नीच कृत्य करण्यासाठी मंगळवारी नेले होते. पिडित मुलीला तिची आई दवाखान्यात भरती आहे, असे सांगून नराधम मामाने तिला मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर अकोट तालुक्यातील अकोलखेड शेतशिवारात नेले. आड रस्त्याने मोटारसायकल जात असल्याचे पाहून पिडित मुलीला मामाच्या नियतीवर संशय आला. मामाने भाचीला शेतात नेले. तेथे तिला चाकू दाखवला. चाकू पाहताच अल्पवयीन मुलगी घाबरून बेशुद्ध पडली. हे पाहून मामा तिला शुद्धीवर आणण्यासाठी पाणी आणावयास गेला. दरम्यान, पिडीत मुलीला शुद्ध आली. तिने त्या शेतातीलच वाढलेल्या पऱ्हाटीच्या पिकात आश्रय घेतला. तत्पूर्वी तिला शेतात एक झोपडी दिसली. एक क्षण तिला झोपडीत आसरा घ्यावा, असेही वाटले. मात्र, ही झोपडी मामाचीच असावी, असे वाटल्याने तिने झोपडीत आसरा घेणे टाळले. दरम्यान, तिचा उर्वरित.पान
मामातिला शोधण्यासाठी आला. त्याची चाहुल लागताच ती पऱ्हाटीच्या पिकात कोणतीच हालचाल करता लपून राहीली.

मामाची बनावट स्टोरी : मुलगी हातातून निसटल्यावर नराधम मामाने सायंकाळी वाजताच्या सुमारास गावकऱ्यांना बनावट स्टोरी सांगितली. मी माझी भाची मोटारसायकलवर जात असताना अज्ञात तीन ते चार जणांनी माझ्यावर हल्ला केला भाचीला घेऊन गेले, असे त्याने गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनी ताबडतोब अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्याचवेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मनवरे हे अकोलखेड येथील गजानन महाराज विहिर संस्थानमध्ये गेले होते. त्यांनी पोलिसांना निर्देश दिलेत. त्यानंतर शोधमोहिम राबवली. या मोहिमेत मुलीच्या चपला सापडल्यात पण मुलगी मिळाल्याने गावकरी पोलिस हैराण झालेत. त्यांची शोध मोहीम सुरू असताना पिडीत मुलगी पऱ्हाटीच्या पिकातून हे सर्व पाहत होती. मात्र, ती प्रचंड घाबरली होती. अंधुक प्रकाशात तिला नेमके किती व्यक्ती आहेत, मामा तिथे आहे काय, याचा अंदाज आल्याने तिने बाहेर पडण्याचे र्धेर्य केले नाही.

बुधवारच्या पहाटेने दिला दिलासा : बुधवार,सप्टेंबरच्या पहाटेने तिला दिलासा मिळाला. ती लपलेल्या शेताच्या बांधावरून जाणाऱ्या तंटामुक्त समिती सदस्यांना दिसली. त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. नंतर गावकरी गोळा झाले. त्यांनी पिडितेला अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला आणले. त्यानंतर प्रकरण स्पष्ट झाले.

राजकीय दबावाची भीती : आरोपी मामाच्या बंधुने पोलिस अधिकाऱ्यांवर मुलीचा शोध घेण्यासाठी राजकीय दबावाची भीती दाखवली. मात्र, मुलगी सापडल्यानंतर भाऊच आरोपी निघाल्याचे पाहून त्याने आमचे घरगुती प्रकरण आहे, अशी सारवासारव केली.

सरपटत केला बचाव
उठूनधावल्यास मामा सोडणार नाही, या भीतीने पिडित मुलीने सरपटत जाऊन बचाव केला. पऱ्हाटीच्या पिकातून ती गुडघे कोपरांचा वापर करत सरपटत गेली. घटनास्थळापासून ती दूर गेली.

भीतीने जागून काढली रात्र
पिडित मुलीने नराधम मामा जंगली प्राण्यांच्या भीतीने पऱ्हाटीच्या पिकात निपचित पडून रात्र जागून काढली. मामा पुन्हा अब्रुवर घाला घालण्यासाठी आला तर बचाव व्हावा, म्हणून तिने रात्रभर हातात दगड ठेवले होते. कानोसा घेत भीतीने रात्र जागून काढली.
बातम्या आणखी आहेत...