आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोणार येथे अवैध गर्भपात करताना अल्पवयीन मुलीचा मृत्यू, डॉक्टरसह आई-वडिलांना 7 दिवसांची कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार - १५ वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न होताच डॉक्टर सुभाष पुरोहित तिचे आई-वडिलांना २० नोव्हेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली होती. तसेच लोणार येथील या डॉक्टरच्या दवाखान्यास सिल ठोकण्यात आले. दरम्यान आज तिन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

आरडव येथील अल्पवयीन मुलीचा डॉ. सुभाष पुरोहित यांच्या साई क्लिनिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ६. ३० वाजता घडली. यावेळी डॉ.सुभाष पुरोहित उपचार करत असताना वडील पन्नाशा भोसले लता भोसले मुलीच्या सोबत दवाखान्यात होते. परंतु उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू होताच त्याठिकाणी गदारोळ झाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनी लता भोसले रा.आरडव यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली तपास सुरू केला.

 

दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी मयत अल्पवयीन मुलीचे लोणार ग्रामीण रुग्णालयात डॉ. राजश्री बनसोडे , डॉ.भटकर, स्त्री रोग तज्ञ डॉ. लोणकर यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरिता पाटील यांनी लोणार येथील साई क्लिनिकची तपासणी केली असता डॉ.सुभाष पुरोहित यांनी त्या १५ वर्षीय मुलीचा गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले. आणि गर्भपात करताना त्या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप भटकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून २० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत कारवाई चालली. दरम्यान, तिची आई लताबाई पन्नाशा भोसले, वडिल पन्नाशा माणिक भोसले डॉ. सुभाष पुरोहित यांचेवर गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली.

 

दरम्यान आज २१ नोव्हेंबर रोजी डॉक्टर पुरोहित तसेच मृतक मुलीचे आई वडिल यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने उपरोक्त तिन्ही आरोपींंना सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक उकंडराव राठोड, ना.पो.कॉ. संतोष चव्हाण, कैलास चतरकर, रवींद्र बोरे करीत आहे.

 

साई क्लिनिकला लावले सिल
महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनल अॅक्ट ३७ नुसार डॉ.सुभाष पुरोहित यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शल्यचिकित्सक डॉ.सरिता पाटील यांनी सोमवारी रात्री साई क्लिनिकला सिल ठोकले आहे.

 

आईला केली अटक
वैद्यकीय गर्भपात कायद्याच्या विविध कलमानुसार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार महिला आरोपी लताबाई पन्नाशा भोसले वय ६० वर्ष रा.आरडव ता.लोणार यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

अल्पवयीन मुलीस गर्भवती करणाऱ्याचा तपास सुरू
मृत झालेली अल्पवयीन मुलगी ही पाच महिन्याची गर्भवती होती. अशी माहिती सुत्राने दिली आहे. या प्रकरणात मुलीला गर्भवती करणारी ती व्यक्ती कोण, याचा तपास पोलीस करीत आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी काही जण अडकण्याची शक्यता आहे.

 

बातम्या आणखी आहेत...