आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व, मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहीहांडा - चोहोट्टाबाजार येथील १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याने तिला गर्भधारणा झाली. या पिडीत मुलीला शुक्रवारी रात्रीच कन्यारत्न झाले असून, तिचे सिझरिंग करावे लागले. बाळ बाळंतीन दोघांनी प्रकृती ठीक असली तरी मुलीची मानसिक स्थिती पाहता तिचे आधी मानसोपचार तज्ञांकडून ऑब्झर्व्हेशन होईल. नंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. चोहोट्टा येथील एका १४ वर्षीय मुलीच्या गरिबीचा अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर जबरी बलात्कार केला. तिला जेव्हा गर्भधारणा झाली तेव्हा या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटकसुद्धा केली. या मुलीला जिल्हा स्त्री रुग्णालयात मेडिकल उपचारासाठी भरती केले. याच दरम्यान आरोपीला न्यायालयाकडे पीसीआर दिला. डीएनए टेस्टिंगसाठी त्याच्या रक्ताचे नमुनेसुद्धा नागपूरला पाठवण्यात आले. आरोपी वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी काही संशयित लोकांचे बयान घेतले. परंतु, पिडीत मुलगी ठोसपणे नावे सांगत नसल्यानेच ती अल्पवयीन तसेच तिच्यावर अल्पवयात मातृत्व लादल्याने तिची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने बालकल्याण समिती तिचे बयान घेणार होते. परंतु, याच दरम्यान शुक्रवारी रात्री तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात कन्यारत्न झालेले बाळ अत्यंत गोंडस आहे. सध्या जो आरोपी पोलिसांनी पकडला आहे, त्याला मुलीच्या नातेवाइकांनी प्रत्यक्ष पहिल्यामुळे त्याचे नाव या प्रकरणात पक्के झाले आहे. आता उर्वरित आरोपींची नावे मुलीच्या बालकल्याण समितीसमोरील बयाणातून समोर येणार आहे. परंतु, त्या मुलीचे नेमके बयान काय येणार, या कडे चोहोट्टासह परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. 
बातम्या आणखी आहेत...