आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'mission Dilasa' Activities Will Learn Highcourt

अाता हायकाेर्ट जाणून घेणार ‘मिशन दिलासा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पु्नर्वसन करणाऱ्या मिशन दिलासा या उपक्रमाची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. मिशन दिलासाबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत गुरुवार, २१ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहणार आहेत.
मिशन दिलासाची मुहूर्तमेढ पोळ्याच्या दिवशी रोवण्यात आली. मिशन दिलासाअंतर्गत शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची शपथ नववर्षाच्या पहिल्या दिवशी देण्यात आली. दरम्यान, मिशन दिलासासाठी पाठिंबा देण्यासाठी समाजातील अनेक सामाजिक शेतकऱ्यांच्या मुलांंना फीसाठी मदत, शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना व्यवसाय सुरू करून देणे यांसारखे विविध उपक्रम राबवले. याशिवाय चला आत्महत्यामुक्त करू या आपले गाव अंतर्गत अधिकारी गाव दत्तक योजना सुरू केली. या सर्व उपक्रमांची दखल उच्च न्यायालयाने घेऊन यापूर्वीच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे १८ डिसेंबर रोजी कौतुक केले आहे. नेमकी मिशनची माहिती जाणून घेण्यासाठी गुरुवारी उच्च न्यायालयात माहिती घेण्यासाठी बोलावले आहे. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हेसुद्धा जात आहेत.