आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे डफडे बजाव आंदोलन, उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांबाबत निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर- मलकापूर आणि नांदुरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून महागाई कमी करावी, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेची कामे द्यावीत, तसेच शेतकरी लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत त्वरित धान्यपुरवठा करावा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.

पक्षाचे शहराध्यक्ष नानासाहेब बाबर यांच्या नेतृत्वात दुपारी १२ वाजता हे आंदोलन करण्यात आले. या दरमयान उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात अत्यल्प पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यातच ५६ पैशांपर्यंत आणेवारी दर्शवण्यात आल्याने हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. महागाई वाढली असून, अन्नधान्य, डाळींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले. मलकापूर आणि नांदुरा तालुक्याच्या आणेवारीचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावेत, महागाई कमी करण्यासाठी योग्य पाऊले उचलावीत, शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात अन्नपुरवठा करावा आदी या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या मागण्यांचा विचार करून त्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला. डफडे बजाव आंदोलनात नानासाहेब बाबर, सुभाष तायडे, निखिल चिम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. या वेळी डफडे वाजवत कार्यालयावर जाताना पदाधिकारी कार्यकर्ते.