आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णी तहसीलात मनसेचे पाणपोई आंदोलन, 7 दिवसांपूर्वी दिले निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी (यवतमाळ) - आर्णी तहसिलात गेल्या अनेक वर्षांपासून पाणपोई बंद अवस्थेत आहे. त्यामुळे, तहसिल कार्यालयात विविध कामांसाठी येणार्या ग्रामीण भागातील नागरिकांना या ठिकाणी पिण्याचे पाणी मिळत नाही. 4 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांनी आनोखे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी पाणपोई सुरू केली.
मनसेच्या वतीने सात दिवसांपूर्वी तहसिदार यांना निवेदन देऊन तहसिल कार्यालयातील पाणपोई सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, तहसिल प्रशासनाने गांभीर्य न घेतल्याने मनसेच्या वतीने मोफत पाणी वाटप करून पाणपोई आंदोलन सुरू केले आहे.
बातम्या आणखी आहेत...