आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेबाइल चोरट्यांचा लावला छडा; दाेघांची पाेलिस काेठडीत रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सिटी कोतवाली पोलिसांनी संशयाच्या अाधारावरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता पोलिसांनी त्यांच्याकडून १७ मोबाइल जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत त्यांची रवानगी केली आहे.
राहुल दिलीप दंदी (वय ३०, रा. रिधोरा) आणि शंकर माणिकराव अंबरते(वय ३६, रा. बाळापूर रोड गायत्रीनगर), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना जनता भाजी बाजारातून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीचे १७ मोबाइल रिधोरा आणि जनता भाजी बाजारातच विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हे मोबाइल जप्त केले. या दोन्ही आरोपींनी ३०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत हे मोबाइल विकले. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोबाइल विकत घेणाऱ्यांमध्ये धास्ती बसली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिरुद्ध अढाव, हेडकॉन्स्टेबल गणेश बेदरकर, श्याम शर्मा, विपुल सोळंके, राजेंद्र तेलगोटे, नीलेश इंगळे, अमोल बहादूरकर, नीलेश पाचपवार, खुशाल नेमाडे यांनी केली.

मोबाइल हरवल्याची होते तक्रार दाखल
मोबाइल चोरीला गेल्याची नोंद पोलिस करीत नाहीत, तर तुमचा मोबाइल हरवला, अशी तक्रार पोलिस देण्यास लावत आहे. चोरीच्या गुन्ह्यात वाढ होऊ नये, यासाठी पोलिस चाेरीची तक्रार घेता हरवल्याची तक्रार दाखल करून घेत आहेत.


बातम्या आणखी आहेत...