आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल मोबाइल चोरट्यांना डीबी पोलिसांनी दोन तासात केले जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - अभ्यासिकेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यास रस्त्यात अडवून त्याचा मोबाईल हिसकावून घेत पोबारा करणाऱ्या अट्टल चोरट्यांना शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले. ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष ठाकूर यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. 
 
बुलडाणा शहरातील नवीन पोलीस वसाहतीमधील योगेश गुलाबराव कराळे २६ हा १५ ऑक्टोबर रोजी रात्री वाजता अभ्यासिकेमध्ये जात होता. भारत विद्यालयाजवळून टिळकवाडीत परिसरात विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी योगेशला अडविले. तसेच त्याच्या जवळ असलेला चार हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून पोबारा केला. 

या प्रकरणी योगेश कराळे याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील मध्यवस्तीत घडलेली ही घटना ठाणेदार सुनील जाधव यांनी गांभीर्याने घेत डि.बी. पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष ठाकूर यांना तपासाचे आदेश दिले. ठाकूर यांनी त्यांचे सहकारी पोलीस हवालदार दिलीप पवार, पोना सुधीर मगर, प्रकाश बाजड, पोलीस शिपाई कृष्णा निकम यांना सोबत घेवून तपासचक्रे फिरवत खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून शहरातील मिलींद नगरमध्ये राहणाऱ्या गजानन रुस्तुम मोरे ३० सोनु दयानंद नरवाडे २६ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी उपरोक्त गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला चार हजाराचा मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली वीस हजार रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकुण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...