आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"तू मला पाहून हसत जा..!' असे म्हणणे पडले युवकाला महागात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नदीवरकपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेला एका २० वर्षीय युवकाने एकटी पाहून गाठले "तू मला पाहून हसत जा..!', असे म्हटले. महिलेच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सोमवारी अकोला न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
चान्नी येथील विवाहित महिला १९ मार्च रोजी कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. एकटी पाहून गावातीलच गोपाल भगवान लाहूडकर हा युवक तिच्याजवळ गेला. "मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो, तू दिसली नाही, तर जेवण करत नाही, तू माझ्या घरासमोरील गल्लीतून जाताना मला पाहून हसत जा, तुझ्याशिवाय मला करमत नाही', असे म्हणून महिलेचा हात धरला. महिलेने त्याला विरोध केला. घरी गेल्यावर तिने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर महिला तिच्या नातेवाइकांना घेऊन चान्नी पोलिस ठाण्यात पोहोचली पोलिसांना आपबिती सांगितली. पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल करून घेत गोपाल लाहूडकर याच्याविरुद्ध भादंवि ३५४, अनुसूचित जाती/ जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला २० मार्च रोजी अटक केली. २१ मार्चला त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. आरोपीतर्फे अॅड. केशव एच. गिरी, अॅड. वैशाली गिरी भारती यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...