आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माकड दिसले की, पोलिस सुटतात पळत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पोलिसांना पाहून चोर पळतात. मात्र माकडला पाहून पोलिसच पळत असतील तर.. असा पळापळीचा खेळ सोमवारी दुपारी रामदासपेठ पोलिस ठाण्यात सुरु होता. माकडाची दहशत एवढी की पाेलिस माकडाला पाहून लपून बसले.
रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक माकड आहे. अंत्यत रागीट असलेल्या या माकडाच्या दहशतीत पोलिस आहेत. या माकडाकडे कुणी पाहिले तरी त्यांच्याच मागे हे माकड पळत सुटते आणि त्या माकडाच्या भीतीने सर्व जण पळत सुटतात. रविवारी दुपारी वाजता रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या आवारातील झाडाखाली काही कुत्री होती. त्यातील एका कुत्र्यांची नजर त्या माकडावर चुकून पडली.

त्यानंतर या माकडाने कुत्र्याच्या अंगावर उडी घेतली आणि त्याचे कान पकडून त्याला झोडपले. कुत्रा शांत झाला की पुन्हा त्याला झोडपण्याचे काम हे माकड करू लागला. हा प्रसंग येथील पोलिस पाहत होते. मात्र पुढे जाऊन माकडाला हाकलण्याची हिंमत एकाही पोलिसांने दाखवली नाही.

अशातच दुसऱ्या पोलिस ठाण्यातील एका पोलिसाने पुढे जाण्याची हिंम्मत दर्शवली. तर माकडाने त्याला टार्गेट केले. त्याच्या मागे ते माकड धावत सुटले. हे पाहून त्याच्यासह सर्वच पोलिस ठाण्याच्या दिशेने पळायला लागले. यावेळी पोलिसही आणि बाहेरून तक्रारीसाठी आलेले नागरिकांनी पोलिस ठाण्याच्या चार भिंतीचा आसरा धरला. विशेष, म्हणजे दिवसभर या माकडाची दहशत मात्र रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत होती. दरम्यान, माकडाची ही दहशत मागील दाेन वर्षांपासून कायम अाहे. गेल्या वर्षीही दाेन जनांचा माकडाने चावा गेतला हाेता. तसेच अनेक कुत्र्यांना माकडाने टार्गेट केले हाेते. शहरातील काही भागात मागील काही दिवसात माकडाने नागरिकांना लक्ष्य केल्याच्या काही घटना घडल्या अाहे.

गेल्या वर्षी माकडाने घेतला होता दाेघांना चावा
गेल्या वर्षी रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत या माकडाची दहशत होती. पोलिस ठाण्याच्या आवारात दोघांना माकडाने चावा घेतला हाेता. रस्त्यावरच गडलेली ही घटना अनेकांनी पाहिली हाेती. रविवारीही माकडाची दहशत दिसून अाली.
बातम्या आणखी आहेत...