आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Wanted Convict Of Nagpur Police Arrested In Akola

नागपूर पोलिसांचा वॉन्टेड आरोपी अकोला कोतवालीच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नागपूर येथे लाखो रुपयांच्या टायरची चोरी करणारा आरोपी, शहरातील हाणामारीतील फरार आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी जानेवारी रोजी अटक केली. दरम्यान, या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलिस गुरुवारी शहरात दाखल झाले.

शुभम संजय गवई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. डिसेंबर महिन्यात गांधी-जवाहर बागेसमोर अमोल कांबळे यांच्यासोबत या आरोपीने वाद घातला होता. त्यानंतर कांबळे यांना त्याने मारहाण करून त्याच्या हाताला चावा घेतला होता. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात शुभम गवईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपी फरार होता. गुरुवारी सिटी कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर हा आरोपी नागपुरातील वाडी पोलिसांनाही टायर चोरी प्रकरणात हवा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाडी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार वाडी पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी शहरात दाखल झाले. ही कारवाई पोलिस हेडकॉन्स्टेबल श्याम शर्मा, नीलेश गोरे, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश इंगळे, खुशाल नेमोडे, नीलेश पाचपवार, अब्दुल माजीद यांनी केली.

कारागृहातील ओळख ठरली गुन्ह्यासाठी कारणीभूत
शुभम गवई कारागृहात असताना त्याची ओळख नागपूरच्या ट्रक ड्रायव्हरशी झाली होती. सुटका झाल्यानंतर ड्रायव्हरने त्याला नागपूरला नेले होते. काही दिवसानंतर शुभमच्या संगनमताने १७ लाखांचे टायर चोरले होते. याप्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हे दाखल करून ड्रायव्हरला अटक केली होती. मात्र, शुभम फरार होता.