आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या अकाली निधनानंतर आई चालवत आहे ‘शिक्षणाचा वसा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांच्या गौरवप्रसंगी बोलताना हमीदा साबीर हुसेन खामोशी. - Divya Marathi
विद्यार्थ्यांच्या गौरवप्रसंगी बोलताना हमीदा साबीर हुसेन खामोशी.
अकोला : गणितज्ञ अली सर यांचे अकाली निधन झाले. त्यांच्यानंतर शिक्षणाची परंपरा त्यांची आई हमीदा साबीर हुसेन खामोशी या व्रत म्हणून पुढे नेत आहेत. होलिक्रॉस कॉन्व्हेंटमध्ये विद्यादानाचे कार्य करुन विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करत आहेत. क्लासमधील गुणवंतांचा शनिवारी गुणगौरव करण्यात आला. 
 
या वेळी अॅड. सत्यनारायण जोशी, प्रभजीतसिंग बछेर,साबीर हुसेन खामोशी,केंद्र संचालिका हमीदा साबीर हुसेन खामोशी उपस्थित होत्या.प्रारंभी दिवंगत अलींच्या प्रतिमेला हारार्पण केले. आयआयटीत नामांकन झालेली प्रियंका कंकाळ, गुणवंत विद्यार्थी गुंजन अग्रवाल, अर्सलान शाकिब, साहिल पन्हाळे,जानवी सेठ,कुणिका चितलांगे, इशिका गुप्ता, मुस्कान गाझी, हिरल सांगाणी,स्वप्नील तन्ना, मनाली सिंघानिया, राजलक्ष्मी राऊत, श्रुती खंडेलवाल, हाजी इस्माईल, वैदेही गोडा, दिशा फाफट, शर्वरी हारस्कार, बारावीतील महेश मिश्रा, अबुल टिमवला, मो.इजान, सिद्धांत वानखडे, क्षितिजा मायी,शिवानी जांगीड आदींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरवले. राजेश जालान,सनदी लेखापाल मीना जालान समवेत शिक्षण देणाऱ्या शिक्षिकेचा बहुमान केला. प्रास्ताविक हमिदा खामोशी यांनी केले.संचालन जुली कुकरेजा यांनी केले.आभार हर्नील गुजराल यांनी मानले. 
 
बातम्या आणखी आहेत...