आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्या बाळाकडे लक्ष ठेवाल हो', असे सांगून ती कैदाशीन गेली ती कायमचीच....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र. - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र.
अकोला - अनैतिक संबंधांतून जन्मलेले म्हणून किंवा मुलगी नको या बुरसटलेपणातून बाळ टाकून देण्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या. कुणी कचऱ्यात फेकतं. कुणी देवळात ठेवून जातं तर कुणी चर्चमध्ये. पण अकोल्यात एक कैदाशीन अशीही निघाली की राजरोसपणे लोकांच्या डोळ्यादेखत मूल ठेवून पळून गेली, ती परत येण्यासाठीच...
अशी घडली घटना

वेळ मंगळवारी सकाळी 7 वाजताची. सर्वोपचार रुग्णालयाचा परिसर. पावसाची रिपरीप सुरू होती.
अशात एका चिमुकलीला कुशीत घेऊन एक बुरखाधारी महिला धावपळ करत रुग्णालय इमारतीतून बाहेर आली. पाच ते दहा दिवसांपूर्वी त्या चिमुकलीचा जन्म झालेला असावा. चिमुकलीला कुशीत घेऊन ती कॅन्टीनच्या बाजूला असलेल्या समता लॉन्समध्ये काही मिनिटे बसली. तिने लेकराला काही वेळ कुरवाळले. थोड्या वेळाने कापडात गुंडाळलेल्या चिमुकलीला खाली ठेवले. बराचवेळ ती तिच्याकडे साश्रुनयनांनी बघतच होती. तिकडे काही अंतरावर एक पुरुष तिची वाट पाहत उभा होता. कदाचित तो तिचा पती असावा. 'हॉटेलमधून परत येते, माझ्या लेकरावर लक्ष ठेवा', असे शेजारी बसलेल्यांना तिने सांगितले अन् ती निघून गेली. गेली, ती परत आलीच नाही. काही वेळाने जन्मदात्रीचा उबदार स्पर्श थंडावला. वातावरणात गारवा चिमुकलीला भेदला. ती रडू लागली. आता ज्यांना लक्ष ठेवण्याची विनंती त्या मातेने केली होती त्यांनी आजूबाजूला त्या मातेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, ती दिसणार होतीच कुठे. अखेर त्या लोकांनी रुग्णालयात असलेली पोलिस चौकी गाठली आणि पोलिसांना हकिगत सांगितली. पोलिसांनी त्या दुर्दैवी जीवाला ताब्यात घेतले आणि डॉक्टरांना बोलावून त्यांच्या सुपूर्द केले. या चिमुकलीवर आता सर्वोपचारमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी त्या निर्दयी मातेविरुद्ध आणि तिच्यासोबत असलेल्या एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा ' ...अन् बघणाऱ्यांचेही डोळे पाणावले' ...