आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानव-वन्यप्राणी सहजीवनासाठी मुखर्जी जन-वन विकास योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यातीलव्याघ्र प्रकल्पांतील बफर क्षेत्र तथा अभयारण्यलगत असलेल्या गावांचा सर्वांगीण विकास करून मानव-वन्यप्राणी सहजीवन प्रस्थापित करण्यासाठी २०१५-२० या कालावधीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राज्यभरात प्रकल्प स्वरूपात राबवण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांमध्ये वन, वन्यजीव संवर्धनामध्ये स्थानिकांचा सहभाग वाढवण्यासाठी ग्रामसभांसोबत करारनामा करणे, सूक्ष्म आराखडा तयार करणे, शासनाच्या विविध विभागांच्या योजनेतील तरतुदींची सांगड घालून एकात्मिक नियोजनबद्धरीत्या गावांचा शाश्वत विकास घडवण्याचे कार्य होणार आहे. योजनेचे मुख्य उद्दिष्ट गावातील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पन्न, उत्पादकता, पर्यायी रोजगार वाढवणे संरक्षित क्षेत्रातील मानवी दबाव कमी करणे आहे. संरक्षित वनक्षेत्रांच्या संरक्षण संवर्धनात ग्रामस्थांचे योगदान घेणे, मानव-वन्यजीव सहजीवन प्रस्थापित करणे, संवर्धनातून मिळणारा लाभ ग्राम विकासासाठी वापरणे, गावनिहाय सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून गावाचा परिस्थितीकीय विकास साधण्यासाठी सर्व विभागांच्या योजनांमधील तरतुदींची सांगड घालून एकात्मिक, नियोजनबद्ध विकास घडवणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना राबवण्यात येत आहे. सदर योजना व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रातील गावे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्याच्या सीमेपासून किलोमीटर अंतराच्या आत येणाऱ्या गावांमध्ये राबवण्यात येणार आहे. गाव निवडताना गाव समूह (क्लस्टर बेसिस) तत्त्व अवलंबण्यात येईल. गावांची निकषांच्या आधारे निवड करून संबंधित उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, उपविभागीय वनाधिकारी त्यांचे संचालक, मुख्य वनसंरक्षक यांना सादर करणार आहेत. त्यानंतर त्या गावांना अंतिम मान्यता मिळेल. ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे गठन करून त्यामार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. या समितीचे खाते काढून वार्षिक लेखा परीक्षणही करण्यात येईल. समितीमार्फत आधारभूत माहिती संकलित करून सूक्ष्म आराखडे तयार करण्यात येतील. त्याकरिता तज्ज्ञ योजना समन्वयकाचीही निवड करण्यात येईल. योजनेमुळे वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन होईल. संसाधनांचा विकास, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे, पर्यायी रोजगार संधी वाढवण्यास मदत मिळणार आहे. पशू, कृषी, जल संसाधनांचा विकास करण्यासही योजना उपयुक्त ठरणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये
योजनेचेमुख्य उद्दिष्ट गावातील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पन्न, उत्पादकता, पर्यायी रोजगार वाढवणे संरक्षित क्षेत्रातील मानवी दबाव कमी करणे, हे योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे.