आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबागच्‍या राजाला अकोल्याचे जानवे, श्याम चेंडगे यांना मिळाला मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालबागचा राजा - Divya Marathi
लालबागचा राजा
अकोला- नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून दर्शनासाठी मुंबईकर अक्षरक्ष: उड्या घेतात. या गणपतीला असलेले जानवे हे अकोल्याचे आहे, असे म्हटले तर क्षणभर विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. दोन वर्षांपासून मुंबईच्या लाल बागच्या राजाला अकोल्यातून बनवण्यात आलेले जानवे त्याच्या रूपात भर घालत आहे.

लालबागच्या राजाला जानवे बनवण्याचा मान अकोल्याचे श्याम चेंडगे यांना मिळाला आहे. गेल्या वर्षीसुद्धा श्याम चेंडगे यांनी लालबागच्या राजाला जानवे दिले होते. गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी लालबागच्या राजाला जानवे पाठवले होते. यंदाही लालबागच्या राजाला त्यांनी स्वत: तयार केलेले जानवे पाठवल्याचे श्याम चेंडगे सांगतात.

अकोल्याला मान : मुंबईचेश्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजासाठी जानवे बनवण्याआधी मंडळाच्या बेबसाइटला भेट दिली. त्यावरून त्यांनी मंडळाचे प्रमुख अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला. योगायोगाने त्यांना लालबागच्या राजासाठी जानवे बनवण्याचे सांगण्यात आले.
शास्त्रोक्त शिक्षण : गणरायांच्यावस्त्रांमध्ये जानव्याचे महत्त्व आहे. श्याम चेंडगे यांना मिळालेला मान प्रत्येक अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. श्याम हे अकोल्यातील जान्हव्यांची निर्मिती करणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी जानवे बनवण्याचे शास्त्रोक्त शिक्षण हे कोल्हापूर येथून घेतले आहे.

दोन वर्षांपासून पाठवतोय जान्हवे
जानवेहे १०० टक्के कॉटन धाग्याचेच असते. यात तीन पदर राहतात. यंदा लालबागच्या राजाच्या १७ फूट उंच मूर्तीसाठी मुंबई येथीलच अंधेरीच्या राजाला मी जानवे तयार करून पाठवले. हेच जानवे गणपतीला घालण्यात आले. याशिवाय यंदा पुणे, नांदेड, अमरावती, अकोला, अंजनगाव येथील गणपतींसाठी जान्हवे पाठवले आहे. श्यामचेंडगे, अकोला