आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका की कचराकुंडी, महापालिकेत अधिकारीशाहीमुळे लाेकप्रतिनिधीही परेशान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पहिल्याच पावसात महापालिका प्रशासनाचं कर्तृत्व उघडं पडलं. शहरातील अनेक रस्त्यांचं डबकं झालं, तर खुल्या जागांवर उकिरडे उभे राहिले. सर्व्हिस गल्ली कचराकुंड्या बनल्या असून, नाल्यांचं पाणी लाेकांच्या जीवाशी खेळू लागलं अाहे. पावसाळ्यापूर्वी काेणत्याही उपाययाेजना करणाऱ्या प्रशासनामुळे शहरातील जनतेला दवाखान्याच्या चकरा माराव्या लागत अाहे.
‘स्वच्छ अकोला सुंदर अकोला’चा नारा देत कर्तृत्वाचा अाव अाणणाऱ्या महापालिकेतील कारभाराचे दर्शन शहरातील घाण पाहिल्यावर घडते. लाेकप्रतिनिधींनी सूचना दिल्यानंतरही पावसाळ्यापूर्वीची कामे प्रशासनाने केली नाही. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश अाले अाहे. शहरातील रणपिसेनगर, पत्रकार कॉलनी, महसूल कॉलनी, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, बसस्थानक परिसरातील मागील भाग, बी. आर. हायस्कूल परिसर, चिवचिवबाजार, सिंधी कॅम्प, सिव्हिल लाइन्स आदी ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झालेले आहेत. नागरिक, हॉटेल व्यावसायिकांनी एवढेच नाही तर डॉक्टरांनीसुद्धा रिकाम्या जागा कचऱ्यासाठी निशाणा बनवलेल्या दिसून येतात. घनकचऱ्यामुळे डेंग्यू, कॉलरा, स्वाइन फ्लू, साथीचे आजाराचा धोका वाढला आहे.

हेसर्व कशामुळे : कचऱ्याचीयोग्य विल्हेवाट लावल्या जात नाही. त्यापासून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले. वाटेल तेथे कचरा टाकल्या जात आहे. एक दिवसापेक्षा जास्त साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी येते. ती हवेत पसरून जंतू संसर्ग होतो. कचऱ्यातील प्लास्टिक पदार्थ गटाऱ्यामध्ये अडकतात. हे साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरत आहे. नागरिकही जागा मिळेल तेथे कचरा फेकून मोकळे होत असल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

खाद्यपदार्थही दूषित : कचऱ्याचीदुर्गंधी वातावरणात पसरल्यावर उघड्या पदार्थांवर त्याचा परिणाम होतो. असे पदार्थ खात आहोत. यामुळे आतड्यांचे विकार, डेंग्यू, मलेरियासारखे आजार हाेत आहेत.

जैविक कचऱ्याचीही वाताहत : शहरातदवाखान्यांची संख्या वाढली आहे. या दवाखान्यातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने होत नसल्याचे दिसून आले.
दवाखान्यासमोरील रिकाम्या जागेत किंवा सर्व्हिस गल्लीत जैविक कचरा फेकला जातो. कचरा शहरवासीयांच्या संपर्कात येत असल्याने विविध आजारांची लागण झाल्याचे वास्तव आहे.
महापालिकेची डोळेझाक : जैविककचरा विल्हेवाट कायद्यानुसार शहरात कारवाई होत आहे किंवा नाही याची माहिती घेणे नगरपालिकेला बंधनकारक आहे. या प्रकाराकडे प्रशासनाची डोळेझाक दिसून येते. रिकाम्या सीरिज, औषधांची खोकी, ड्रेसिंग केलेल्या पट्टय़ा, दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचऱ्यामुळे रुग्णालयात काम करणाऱ्यांनाही गंभीर आजार होण्याची भीती नाकारता येत नाही.
^आयुक्तांनी लोकप्रतिनिधींचे ऐकायचे नाही असे ठरवले आहे.पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई, कचऱ्याची योग्य विल्हेवाट करणे आदींबाबत निर्देशित केले होते. त्यावर कारवाई झाली नाही. आयुक्त नागरिकांच्या अंत पाहत आहेत.'' - उज्ज्वलाताईदेशमुख, महापौर.

पावसाळ्यात नाल्यांची सफाई
पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला असताना अद्याप शहरातील नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. मात्र, जुलै रोजी भरपावसात महापालिकेचे कर्मचारी जेसीबीच्या साहाय्याने नाल्यांची सफाई करताना दिसले. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांवर दुकानदारांनी पेवर्स बसवले आहेत. यामुळे त्या ठिकाणी नाल्या चोकअप झाल्या आहेत.
पावसाळ्यात नाल्यांची सफाई करण्यात येत अाहे. शहरात जागाेजागी असा कचरा साचला अाहे.
बातम्या आणखी आहेत...