आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Of Vacant Assurance To Pay Within 15 Days

१५ दिवसांत महापालिकेतील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेसंदर्भात जुलैला मुंबईला नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत १५ दिवसांत मनपातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला देण्यात आले. याच बरोबर विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यमंत्र्यांच्या दालनात जुलैला महापालिकेसंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीबाबत नगरसेवक, कर्मचारी तसेच सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या बैठकीत महापालिकेला नेमके काय मिळणार? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. जुलैला झालेल्या या बैठकीत राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी
१५ दिवसांच्या आत उपायुक्त, नगररचनाकार, लेखापाल आदी महत्त्वाच्या पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे अाश्वासन दिले. तर, एशियनच्या धर्तीवर पथदिवे देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव तसेच घरोघरी जाऊन कचरा संकलन करून डंपिंग ग्राउंडपर्यंत नेण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना या बैठकीत राज्यमंत्र्यांनी दिल्या. यासह राज्यमंत्र्यांनी विविध विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करून अडचणी समजून घेतल्या. बैठकीला महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, आयुक्त सोमनाथ शेटे, भाजपचे गटनेते हरीश आलिमचंदानी, शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके आदी उपस्थित होते.

वाढदिवसाचीभेट वेगळी द्या : महापौरउज्ज्वला देशमुख यांचा जुलैला वाढदिवस होता. ही बाब लक्षात घेऊन राज्यमंत्र्यांनी बैठकीला प्रारंभ होतानाच महापौरांना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी वाढदिवसाची भेट द्यायची असेल तर नवे आयुक्त द्या, अशी विनंती महापौरांनी या वेळी राज्यमंत्र्यांना केल्याची माहिती मिळाली आहे.

बैठकीसंदर्भात पत्रात महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता आणि गटनेत्यांनाही बोलावण्यात आले होते. परंतु, या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसंचे गटनेते उपस्थित राहिले नाही. बैठकीचे पत्रही या गटनेत्यांना मिळाले होते. सत्ताधारी गटाने माहिती दिल्याने या तिन्ही पक्षांचे गटनेते बैठकीला अनुपस्थित राहिले.

शासनाकडून विविध निधींमध्ये महापालिकेला ५० टक्के मॅचिंग फंड टाकण्याची अट घातली जाते. त्यामुळे योजनांचे काम मार्गी लागत नाही. महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मॅचिंग फंडची अट दोन वर्षांसाठी शिथिल करावी, अशी मागणी या बैठकीत उपस्थितांनी राज्यमंत्र्यांकडे केली. यावर प्रयत्न करेन, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले.

बैठकीबाबतचे पत्र मिळाले होते. परंतु, महापौरांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप-बमसं या पक्षांच्या गटनेत्यांना बैठकीला जाण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही अथवा िवचारपूसही केली नाही. त्यामुळे या बैठकीला जाण्याचा निर्णय आम्ही तिन्ही गटनेत्यांनी घेतला. -राजकुमार मुलचंदानी,गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस.

पथदिवे दुरुस्ती एशियनच्या धर्तीवर
एशियनलापथदिवे देखभाल दुरुस्तीचे काम देताना सोडियमचे दिवे काढून त्या जागी सीएफएल पद्धतीचे दिवे लावण्याचे कंत्राट देऊन विद्युत देयकात झालेली घटीची रक्कम ही एशियन कंपनीला देण्याचा करार झाला होता. आता सीएफएल पद्धतीचे दिवे काढून त्या जागी एलईडी पद्धतीचे दिवे लावले जाणार आहेत. एलईडीनंतर पथदिव्यांच्या विद्युत देयकात जी घट होईल ती रक्कम आणि देखभालीची रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवला जाणार असून, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या कंपन्यांपैकी एका कंपनीला हे काम दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप-सेना युतीकडे स्पष्ट बहुमत नाही. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काही अपक्षांची मदत घेतली होती. परंतु, त्यानंतर मदत करणाऱ्या या गटांना सत्ताधारी गटाने फारसे महत्त्व दिले नाही. बैठकीबाबतही फारसे महत्त्व दिल्याने आता राष्ट्रवादीही भाजपवर नाराज आहे.
नवे मित्र शोधावे लागणार?
गटनेते बैठकीला अनुपस्थित
मॅचिंग फंड दोन वर्षांसाठी रद्द करा