आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या ३४ पैकी १७ शाळांत केजी-१, चार शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाचीही सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली असताना चालू शैक्षणिक वर्षांत एकूण १७ शाळांमध्ये केजी-१ तर चार शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमही सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास मदत होईल, तर दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गत १५ ते २० वर्षांपासून ओस पडताहेत. यामागे पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाविषयी निर्माण झालेली जागरूकता तसेच स्पर्धा, या बाबी कारणीभूत ठरल्या, तर दुसरीकडे प्रशासनाने तसेच शिक्षकांनीही स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. या सर्व कारणांमुळे मनपा शाळांची संख्या दरवर्षी घटत चालली आहे. मागील शैक्षणिक वर्षांत मनपाच्या ५५ शाळा होत्या. आज त्या ३४ वर आल्या आहेत. या गंभीर बाबी लक्षात घेऊनच चालू शैक्षणिक वर्षांत मनपा शाळांमध्ये केजी-१ वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर सेमी इंग्रजी माध्यमही सुरू करावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला सर्वच शाळांनी प्रतिसाद दिला नाही. परंतु, केजी-१ साठी ५० टक्के शाळांनी प्रतिसाद दिला. मनपाच्या मराठी, हिंदी, उर्दू या तिन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये केजी-१ वर्ग सुरू केले, तर चार शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमही सुरू केले आहेत. त्यामुळे डोनेशनअभावी खासगी शाळेत प्रवेश घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मनपा शाळांमध्येच सेमी इंग्रजी माध्यमाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या शाळेत सुरू झाले केजी-१ वर्ग
{मराठीमुलांची शाळा क्रमांक -
{मराठी मुलांची शाळा क्रमांक १६
{मराठी मुलांची शाळा क्रमांक १९
{मराठी मुलांची शाळा क्रमांक २६
{मराठी मुलींची शाळा क्रमांक

७२ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
महापालिकेनेसुरू केलेल्या केजी-१ वर्गाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच वर्षी एकूण ५७२ विद्यार्थ्यांनी केजी-१ मध्ये प्रवेश घेतला आहे. यात मराठी शाळेत १७९, हिंदी शाळेत २०, उर्दू शाळेत ३७३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

चार शाळांमध्ये सेमी इंग्रजी
महापालिका मराठी शाळा क्रमांक सात, शाळा क्रमांक १६, शाळा क्रमांक २६ या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले आहे. सेमी इंग्रजी माध्यमाची सुविधा शाळांमध्ये सुरू झाल्याने आता महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणे शक्य होणार आहे.

उर्दू शाळांचा समावेश
शाळाक्रमांक -१ उर्दू मुलांची शाळा क्रमांक - उर्दू मुलांची शाळा क्रमांक - उर्दू मुलांची शाळा क्रमांक - उर्दू मुलांची शाळा क्रमांक - उर्दू मुलांची शाळा क्रमांक - उर्दू मुलांची शाळा क्रमांक - उर्दू मुलांची शाळा क्रमांक - १० उर्दू मुलांची शाळा क्रमांक - १२ उर्दू मुलींची शाळा क्रमांक - उर्दू मुलींची शाळा क्रमांक - उर्दू मुलींची शाळा क्रमांक -