आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका प्रशासनाविरुद्ध आता नगरसेवक "एल्गार'च्या मूडमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ११ कोटी ८४ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाल्यापासून मनपात निर्माण झालेले वादळ अजून शमले नाही. प्रभागातील कामे रखडल्याबाबत नगरसेवकांनी संताप व्यक्त करत २० जानेवारीला आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागितली. परंतु, व्यस्त असल्याने २१ ला भेटण्याचे आश्वासन त्यांनी नगरसेवकांना दिले. यामुळे प्रशासन विरुद्ध नगरसेवक, असे चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता अाहे.

पाणीपुरवठा योजनेतील विविध कामांच्या दुरुस्तीसाठी बोलावलेल्या ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या निविदांना चर्चा पूर्ण होऊ देता मंजुरी दिल्याने सत्ताधारी गटासह विरोधक महापौरांच्या विरोधात एकवटले आहेत. नगरसेवकांची प्रत्यक्षात लढाई महापौरांविरुद्ध आहे. परंतु, प्रस्तावाची अंमलबजावणी केल्यास महापौर आणि प्रशासन यांच्यासोबत ही लढाई सुरू होण्याची चिन्हे आहेत. आयुक्त लहाने संबंधित कंपनीला कामाचे आदेश देण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळेच नगरसेवकांनी आता प्रशासनाच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारण्याचा मनसुबा रचला आहे. यासाठी रखडलेली कामे, पाणीपुरवठ्यात निर्माण होणारा व्यत्यय आदी कारणे समोर केली जात आहे. या अनुषंगानेच आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, भारिप-बमसं आणि काही अपक्ष नगरसेवकांनी आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. १९ जानेवारीला भेट होऊ शकल्याने अनेक नगरसेवकांनी आयुक्तांना भेटण्यासाठी बुधवारी मनपात ठाण मांडले होते. परंतु, दिवसभर शेड्युल्ड बिझी असल्याने गुरुवारी भेटू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. यामुळे नगरसेवकांच्या संतापात भर पडली. गुरुवारी आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ दिल्यास, प्रशासन नगरसेवकांतील दरी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वड्याचे तेल वांग्यावर
एल्गार मागे११ कोटी ८४ लाखांच्या निविदांची झालर नाही. मूलभूत सोयी- सुविधा नगरोत्थानच्या दहा कोटींमधून सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांना ६०, तर विरोधकांना ४० याप्रमाणे वाटप करण्याचे ठरले होते. परंतु, प्रत्यक्षात असे वाटप झाले नाही. याचा रोषही नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळे या असंतोषात वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकारही सुरू आहे.

‘आय अॅम इन मीटिंग’ का मेसेज भी नहीं
आयुक्त व्यस्त असले तर काॅल करणाऱ्यास ‘आय अॅम इन मीटिंग’, असा मेसेज टाकतात. परंतु; आज काही नगरसेवकांनी त्यांना कॉल केल्यानंतर कॉल उचलला नाही अथवा ‘आय अॅम इन मीटिंग’ असा मेसेजही पाठवला नाही. त्यामुळे काही नगरसेवकांनी कमसे कम ‘आय अॅम इन मीटिंग’ ऐसा मेसेज तो डालना था, असे स्वगत व्यक्त केले.