आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचांग घेऊन बसले खरे, मात्र मुहूर्त निघालाच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेतील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची १२ जुलैला बंदद्वार बैठक झाली. या बैठकीत पंचांग पाहण्यात वेळही खर्च झाला. परंतु, महासभेचा मुहूर्त मात्र समितीला मिळालाच नाही. परिणामी, स्थगित महासभेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेत भाजप-सेनेची सत्ता आहे. परंतु, गटातटात भाजप विभागल्या गेल्याने विकासकामे खुंटली आहेत. भाजपला सत्तेत येऊन ३०० दिवसांचा कालावधी झाला असताना सत्ताधा-यांनी केवळ सहा सभा घेतल्या. या सहा सभांमध्ये कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही. भाजपमधील गटातटाचे वाद मिटवण्यासाठी कोअर समिती गठित करण्यात आली होती. या समितीत राज्यमंत्र्यांपासून खासदार, आमदारांचा समावेश होता. परिणामी, हे सर्व एकत्र यायची संधी फारच कमी होती. त्यामुळे कोअर समितीची बैठक अनेकदा लांबणीवर पडली. त्यामुळेच पाच जुलैला झालेल्या कोअर समितीच्या बैठकीत चार जणांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीला महापालिकेतील कामकाज मार्गी लावण्याचे अधिकार देण्यात आले. या समितीत महापौर उज्ज्वला देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, सभागृह नेते योगेश गोतमारे, गटनेते हरीश आलिमचंदानी यांचा समावेश आहे. या चौघांची समिती गठित झाल्याने आता स्थगित महासभेचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा नगरसेवकांना होती. त्या अनुषंगानेच १२ जुलैला समितीच्या बैठकीकडे नगरसेवकांचे लक्ष लागले होते. समितीच्या बैठकीत बस वाहतुकीसह विविध विषयांवर चर्चाही झाली. स्थगित महासभा घेण्याबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे पंचांग बघूनही महासभेसाठी मुहूर्त निघाल्याने आता महासभा केव्हा होणार? याबाबत नगरसेवकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

स्थायी समिती कळीचा मुद्दा
भाजपच्याकोअर समितीने चार जणांची समिती गठित करून मनपाची जबाबदारी या समितीवर सोपवली आहे. कोअर समितीने दिलजमाई करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, स्थायी समिती जोपर्यंत अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत ख-या अर्थाने दिलजमाई होणार नाही, सभेचा मुहूर्तही निघणार नाही, अशी चर्चा भाजप नगरसेवकांमध्ये सुरू आहे.