आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचही नगर परिषदांमध्ये उद्या विषय समित्यांची निवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अलीकडेच सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे गेलेल्या जिल्ह्यातील पाचही नगरपालिकांमधिल प्रथम वर्षीच्या विषय समित्यांच्या निवडणुका सोमवार, जानेवारी रोजी होत आहेत. सदस्य संख्येनुसार त्या-त्या ठिकाणच्या विषय समित्यांचे सदस्य ठरवले जाणार आहेत. 

लोकसंख्येच्या निकषानुसार नगरपरिषदांची वर्गवारी निश्चित केली जाते. त्या वर्गवारीनुसार ‘ब’ श्रेणीच्या नगरपरिषदांमध्ये सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता आरोग्य, पाणी पुरवठा जलनिस्सारण, महिला विकास बालकल्याण, नियोजन विकास आणि स्थायी अशा आठ समित्यांचे सदस्य आणि सभापती निवडले जातील. याऊलट ‘क’ श्रेणीच्या नगरपरिषदांमध्ये त्या-त्या ठिकाणचे लोकनियुक्त पदाधिकारी ठरवतील, तेवढ्या समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.
 
शासनाने निश्चित केलेल्या सूत्रानुसार अकोट या ‘ब’ वर्ग नगरपरिषदेत ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. बाळापूर आणि मुर्तीजापूर नगरपरिषदेची श्रेणीही ‘ब’ आहे. परंतु याठिकाणी प्रत्येकी २३ नगरसेवकांची निवड करण्यात आली असून पातूर तेल्हारा या ‘क’ वर्ग नगरपािलकेसाठी प्रत्येकी १७ नगरसेवक विजयी झाले आहेत. या सदस्य संख्येनुसार समित्यांचे सदस्य ठरवले जाणार आहेत. 

सात दिवस उद्या पूर्ण होणार 
पाचहीनगरपालिकांच्या निवडणुका २७ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होऊन नवे पदाधिकारी अस्तित्त्वात आले. या सर्वांची पहिली बैठक गेल्या जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीत उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. त्या बैठकीपासून सात दिवसांचे आत विषय समित्यांचे गठन अनिवार्य असते. त्यानुसार तो कालावधी संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जानेवारीला ही निवडणूक होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...