आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिका निवडणुकीत राहणार वेगवेगळी खर्च मर्यादा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नगरपरिषदेची निवडणूक सर्वत्र सारखी असली तरी उमेदवारांच्या प्रचार खर्चासाठी वेगवेगळी मर्यादा घालून देण्यात आली आहे. तीन नगरपरिषदांमध्ये अडीच तर दोन नगरपरिषदांमध्ये दीड लाखाची रक्कम खर्च करता येणार आहे. आगामी २७ नोव्हेंबर रोजी यासाठी मतदान घेतले जाईल.
जिल्ह्यात निवडणुकीसाठी उभ्या ठाकलेल्या पाच नगरपरिषदा आहेत. ‘ब’ ‘क’ अशा दोन श्रेणीत त्या मोडतात. अकोट, बाळापूर मुर्तीजापूर नगरपरिषदेची श्रेणी ‘ब’ आहे. तर पातूर तेल्हारा नगरपरिषदेची श्रेणी ‘क’ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणावरुन ही श्रेणी ठरत असल्याने शासनाने तशी विभागणी केली आहे.

या विभागणीमुळे उमेदवारांच्या प्रचार खर्चातही फरक पडला आहे. ‘ब’ श्रेणीच्या अर्थात अकोट, बाळापूर आणि मुर्तीजापूर या तीन ठिकाणी नगरसेवकाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना प्रत्येकी २.५० लाख रुपये खर्च करता येणार आहे. याऊलट उर्वरित दोन नगरपरिषदेच्या उमेदवारांना १.५० लाख रुपये खर्च करता येईल. राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी ध. मा. कानेड यांनी ही माहिती राज्यतील संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविली आहे.
या मर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराने आचारसंहिता मोडली, असे समजून त्याच्याविरुद्ध आवश्यक तो खटलाही दाखल केला जाणार असल्याचे त्यांच्या पत्रात नमूद आहे.

लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना
प्रचारा दरम्यान उमेदवारांद्वारे केला जाणारा खर्च त्याचे प्रचार अभियान यावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक यंत्रणेने काही महत्वपूर्ण उपाययोजना आखल्या आहेत. त्यामध्ये व्हिडिओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोष्टसाठी पथक, तक्रार निवारण कक्ष, निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती, मतदार जागृती अभियान आणि मतदारांना वोटर स्लीपचे वाटप यांचा समावेश आहे.

नगराध्यक्षासाठी साडे सात पाच लाख
नगरसेवकांसोबतच जिल्ह्यात नगराध्यक्षांचीही निवडणूक होत आहे. ‘ब’ श्रेणीच्या शहरात (अकोट, बाळापूर मुर्तीजापूर) नगराध्यक्षांची निवडणूक लढणाऱ्यांना ७.५ लाख रुपयांची मुभा देण्यात आली आहे. तर पातूर तेल्हारा या ‘क’ श्रेणीच्या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षाची निवडणूक लढविणाऱ्यांना पाच लाख रुपयेच खर्च करता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...