आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी, मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आज निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - संप काळातील १५ दिवसांचे वेतन कपात करून जून महिन्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन देयक प्रशासनाने तयार केले आहे. त्यामुळे मिळणारे वेतन केवळ १५ दिवसांचेच मिळणार ही बाब सिद्ध झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनापबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, तर याच महिन्यात दसरा दिवाळी हे दोन मोठे सण असल्याने दिवाळी कशी साजरी करावी? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, वेतन कपात करु नये, या मागणीचे निवेदन कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांनी थकित वेतनासाठी २५ मे पासून नियमानुसार नोटीस देऊन काम बंद आंदोलन सुरू केले. संप काळात प्रशासन आणि संघर्ष समितीत अनेकदा चर्चा झाली. परंतु, ठोस उपाययोजना निघाल्याने हा संप सुरूच राहिला. अखेर पालकमंत्री रणजित पाटील यांनी मुंबई येथे बैठक घेऊन हा संप मिटवला. या वेळी संप काळातील दिवसांच्या वेतनाची कपात केली जाईल, असे काहीही ठरले नसताना. प्रशासनाने संप काळातील १५ दिवसांच्या वेतनाची कपात करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी याबाबत स्थायी समितीकडे दाद मागितली.

स्थायी समितीने एकमताने संप काळातील वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु, स्थायी समितीच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत. प्रशासनाने संप काळातील १५ दिवसांचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले. कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन मिळाले असून चार महिन्याचे वेतन थकले आहे. एका महिन्याचे वेतन सेवानिवृत्ती वेतन देण्यासाठी प्रशासनाला सात कोटी रुपये खर्च करावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने जून महिन्याचे वेतन देयक तयार करण्याच्या सूचना दिल्या. या नुसार १५ दिवसाचे वेतन कपात करून देयक तयार केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दिवाळी सण प्रत्येक नागरिक आपापल्या परिने साजरा करतो. शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस अथवा अॅडव्हॉन्स दिला जातो. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस दिले जात नाही.

याउलट १५ दिवसांचे वेतन कपात होणार आहे, तर दहा हजार रुपये फेस्टिवल अॅडव्हान दिला जाणार आहे. त्यामुळे केवळ एक महिन्याचे वेतनच मिळणार असल्याने ही दिवाळी कशी साजरी करावी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अधिकाऱ्यांची दिवाळी मात्र धुमधडाक्यात
महापालिकेत अनेक विभागात राज्य शासनाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर आले आहेत. हे सर्व कर्मचारी दर महिन्याला चुकता वेतन मिळालेल्या कर्मचाऱ्याच्या हातूनच वेतन घेतात. त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी होणार असली तरी महापालिकेतील राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांची दिवाळी मात्र धुमधडाक्यात साजरी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...