आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे, कामबंद आंदोलन १६ पर्यंत पुढे ढकलले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - थकित वेतनासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मनपा कर्मचारी संघर्ष समितीने ऑगस्टपासून पुकारलेले कामबंद आंदोलन अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे तूर्तास मागे घेण्यात आले. प्रशासनाने १६ ऑगस्टपर्यंत मागण्यांची पूर्तता केल्यास १७ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

मनपा कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्याच बरोबर भविष्य निर्वाह निधीची रक्कम, पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, रजा रोखीकरण आदी विविध समस्या सोडवल्यास ऑगस्टपासून कामबंद आंदोलनाचा इशारा निवेदनातून महापौरांसह आयुक्तांना दिला होता. या इशाऱ्यानंतर आयुक्त सोमनाथ शेटे यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र, आर्थिक परिस्थितीचे कारण आयुक्तांनी पुढे ठेवल्याने ही चर्चा फिस्कटली. त्यामुळे ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय संघर्ष समितीने कायम ठेवला. परंतु, ऑगस्टपासून जोरदार पाऊस झाला, तसेच पुढील दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. शहरात अतिवृष्टी झाल्यास आणि त्याच वेळी कामबंद आंदोलन झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल तसेच नागरिकही वेठीस धरल्या जातील, त्यामुळे तूर्तास अांदाेलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात अाला.