आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा अधिकाऱ्यांना मिळते नियमित वेतन, कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन रखडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन थकले अाहे. मात्र, सहा अधिकाऱ्यांना (आयुक्त वगळून) महिन्याच्या एक तारखेला नियमितपणे वेतन दिले जाते. दरमहा वेतन घेऊन वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अधिकारी काम करून घेत असल्याने महापालिकेत केवळ सहा अधिकाऱ्यांनाच कुटुंब आहे का, अशी चर्चा सुरू आहे.
महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न कमी असून, दैनंदिन खर्च करून कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नाही. अशातच एलबीटी बंद झाल्याने एलबीटीच्या अनुदानात घट झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे, असा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे, तर चार महिन्याचे वेतन थकल्याने कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. मार्चमध्ये झालेल्या वसुलीत प्रशासनाला शासकीय देणी द्यावी लागली, एक महिन्याचे वेतनही दिल्या गेले. त्यामुळे आता जोपर्यंत एलबीटीचे अनुदान मिळत नाही, तोपर्यंत प्रशासनाला कर्मचाऱ्यांचे वेतन देता येत नाही. २०१६ या चालू वर्षातील एकाही महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे आम्ही अद्याप २०१५ मध्येच आहोत, अशी खोचक प्रतिक्रिया अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे चार महिन्यांचे वेतन थकल्याने कर्मचारी त्रस्त झाले असताना दुसरीकडे महापालिकेतील सहा अधिकाऱ्यांना मात्र दर महिन्याच्या एक तारखेला वेतन दिले जाते. दरमहा वेतन घेऊन वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून हे अधिकारी काम करून घेत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ते आमचे साहेब आहेत, केवळ त्यांनाच कुटुंब आहे का, आम्हाला कुटुंब नाही, अशी चर्चा सुरू असून, याबद्दल नाराजीही व्यक्त होत आहे.

काही अधिकारी अपवाद; कर्मचाऱ्यांना दिला आधार
यापूर्वीअनेकदा वेतन रखडलेे. काही अधिकाऱ्यांनी दरमहा वेतन घेता, कर्मचाऱ्यांसोबतच वेतन घेऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, उपायुक्त वैभव आवारे यांनी दरमहा वेतन घेता, ज्या महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात असे, त्याच महिन्यात वेतन घेतले.