आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेतील १८ पेक्षा अधिक पदे अजूनही रिक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेतील दोन्ही उपायुक्तांसह १८ पेक्षा अधिक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. आयुक्तांना हँड नसल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी असतानाही विकासकामे रेंगाळली आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. परिणामी, महत्त्वाची अधिकाऱ्यांची रिक्त पदे केव्हा भरली जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सन २००१ ला महापालिका अस्तित्वात आल्याने आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तांसह विविध पदे निर्माण झाली. प्रारंभीच्या काळात आयुक्त, दोन उपायुक्त, सहायक आयुक्त, शहर अभियंता अशा सर्व पदांवर अधिकारी होते. त्यामुळे कामकाजही सुरळीत सुरू होते. परंतु, पुढे महापालिकेतील राजकारणाला कंटाळून अधिकारी वैतागून बदली करून गेले. महापालिकेतील हे चित्र अद्यापही बदललेले नाही. त्यामुळे महापालिका अस्तित्वात येऊन १५ वर्षांचा कार्यकाळ झाला असला तरी अद्यापही १८ पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, पर्यायाने कामकाजही ढेपाळले आहे, तर पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्याकडे विविध विभागांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने अधिकाऱ्यांवरील ताण वाढला आहे. तसेच अधिकाऱ्यांना कोणत्याही एका कामाकडे लक्ष केंद्रित करता येत नाही. या सर्व प्रकारामुळे कर भरणारा सर्वसामान्य नागरिक मात्र नाहक वेठीस धरला जात आहे.

असा होतो परिणाम
आयुक्तांच्या हाताखाली दोन उपायुक्त उपायुक्तांच्या हाताखाली चार सहायक आयुक्त असल्यास कामाची विभागणी केली जाते. आयुक्तांना प्रत्येक कामावर लक्ष ठेवता येते. अधिकाऱ्यांना विभाग बरोबरीने वाटून दिल्यामुळे कामकाज योग्य प्रकारे होते. याच बरोबर नगररचना विभागातील पदे रिक्त असल्याने उपलब्ध दोन कनिष्ठ अभियंत्यांनाच मालमत्तांचे मोजमाप, नकाशा मंजूर करणे, अतिक्रमण, ले-आऊट, सुरू असलेले बांधकाम पाहणे आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. एकाच वेळी एक अथवा दोन अधिकारी याकडे लक्ष देऊ शकत नसल्याने यातून अवैध बांधकामे उदयाला येतात.

उपायुक्तांसह सहायक आयुक्तांची पदे रिक्त : महापालिकेतदोन उपायुक्तांची पदे रिक्त आहेत. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांची चार-पाच महिन्यांपूर्वी बदली झाली, तर दुसरे उपायुक्तांचे पद तीन वर्षांपासून रिक्त आहे. तर, चार सहायक आयुक्तांपैकी एक सहायक आयुक्त कार्यरत असून, तीन पदे रिक्त आहेत.

मनपाच्या आस्थापना खर्च महत्त्वाचे कारण : हीमहत्त्वाची रिक्त पदे भरताना आस्थापना खर्च अधिक हे कारण पुढे केले जाते. परंतु, अधिकाऱ्यांची महत्त्वाची रिक्त पदे भरल्याशिवाय महसुलात वाढ होणार नाही. त्याच बरोबर उत्पन्नाच्या विविध स्रोतांकडे लक्ष दिल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते. महसुलात वाढ झाली की, आस्थापना खर्चही कमी होऊ शकतो.

मनपात कायमच असतात पदे रिक्त
१८ पेक्षाअधिक अधिकाऱ्यांची पदे रिक्त अद्यापही आहेत.
१५ वर्षांचाकार्यकाळ महापालिका अस्तित्वात येऊन झाला.