आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्तव्य पालनातील दिरंगाईबाबत शिस्तभंगाची कारवाई का नको?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महासभेनेमंजूर केलेल्या विविध ठरावांमध्ये कोणताही अधिकार नसताना बदल करणे, कर्तव्य पार पाडण्यास विलंब तसेच दुर्लक्ष करणे आदी सर्व प्रकारांबाबत आपल्यावर महापालिका अधिनियम कलम ७२ (क) नुसार शिस्तभंगाची कारवाई का करू नये? असा इशारा महापौर उज्ज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी आयुक्त अजय लहाने यांना दिला आहे. त्यामुळे आता पदाधिकारी आणि प्रशासनादरम्यान वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एक शासकीय अधिकारी म्हणून नेमून दिलेली कर्तव्ये, शासकीय कामकाज दक्षतेने आणि शीघ्रतेने पार पाडणे आवश्यक आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून आपणाकडून असे होताना दिसत नाही. एखाद्या अधिकाऱ्याने नेमून दिलेले कर्तव्य किंवा त्यांच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य किंवा शासकीय काम पार पाडण्यास जाणूनबुजून अथवा हेतूपुरस्सर विलंब करणे, ही बाब कर्तव्य पालनात कसूर ठरते. महापालिकेच्या मे २०१६ ला झालेल्या सभेत मंजूर झालेला नगरोत्थान निधी अंतर्गत कामांच्या यादीसह ठराव पाठवण्यात आला. परंतु, यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. परिणामी, ही विकासकामे अद्यापही सुरू होऊ शकली नाही. वास्तविकत: कोणत्याही संवैधानिक समितीने घेतलेल्या निर्णयावर एक, दोन अथवा चार दिवसांत कार्यवाही होणे अपेक्षित असताना आपणाकडून हेतूपुरस्सरपणे विलंब केला जात आहे. त्याच बरोबर महापालिकेने केलेल्या ठरावात बदल करणे, नगरसेवकांच्या प्रभागातील सदस्यांच्या कामात ठरावाव्यतिरिक्त वाढीव रक्कम टाकणे, ही बाब शासकीय अधिकाऱ्यास अशोभनीय आहे. तसेच महासभेने दिलेले कर्तव्य करण्यास आपण बांधील असताना आपणाकडून ठरावात बदल कोणत्या कलमान्वये करण्यात येतो? हा सर्व प्रकार कर्तव्यात कसूर करण्यासारखाच आहे. त्यामुळे आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असेही या पत्रात महापौर उज्ज्वला देशमुख आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...