आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाची फसवेगिरी करा अन् मिळवा अापली नोकरी परत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्वसामान्यपणे कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रशासनाची, शासनाची फसवणूक केल्यास कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो. मात्र, महापालिका यास अपवाद ठरली आहे. महापालिकेत कर्मचाऱ्याने फसवणूक केल्याची बाब प्रशासनाने स्वत: मान्य केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करता कर्मचाऱ्याला कामावर रुजू करून घेण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत फसवेगिरी करा नोकरी परत मिळवा, अशी योजना आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सर्व चुकांकडे प्रशासन डोळेझाक करत आहेत, तर सर्वसामान्य होणाऱ्या बदल्यामध्ये हस्तक्षेप करणारे नगरसेवक, पदाधिकारी मूग गिळून बसले आहेत. पदाधिकाऱ्यांनी चुप्पी साधण्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ही बाब सेवानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत सामावून घेण्यामुळे सिद्ध झाली आहे.

आरोग्य विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याने २९ जुलै २०१५ रोजी सिव्हिल सर्जन अकोलाचे प्रमाणपत्र देऊन वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्तीची मागणी केली होती. प्रशासनाने तातडीने या कर्मचाऱ्याला ३१ जुलै २०१५ ला सेवानिवृत्त केले. त्यामुळे गत एक वर्षापासून संबंधित कर्मचारी सेवा निवृत्तिवेतन घेत आहे. या सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्याला मात्र जुलै २०१६ ला प्रशासनाने पुन्हा सेवेत रुजू करून घेतले आहे. रुजू करून घेण्याच्या आदेशात कर्मचाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट करत यापूर्वीच त्यांनी सेवेत पुन्हा रुजू करून घ्या, असा अर्ज दिला असल्याने त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतल्याचे नमूद केले आहे.

फसवेगिरीतरीही इनाम : उपायुक्तसुरेश सोळसे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. जर कर्मचाऱ्याने बनावट प्रमाणपत्र सादर करून सेवानिवृत्ती घेतली आता पुन्हा सेवेत येण्याबाबत विनंती केली आहे. कर्मचाऱ्याने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट आहे, ही बाब लक्षात यायला एक वर्ष का लागले? जर प्रमाणपत्र बनावट आहे, तर संबंधित कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवता, त्या कर्मचाऱ्याला सेवेत रुजू करून घेण्यामागचा प्रशासनाचा नेमका उद्देश कशासाठी? तसेच या मागचे विशेष कारण काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकीकडे अतिरिक्त कर्मचारी
महापालिकेत चतुर्थ श्रेणीचे अतिरिक्त कर्मचारी आहेत, तर काम करणारे कमी असे प्रशासनाच्या वतीने सांगितले जाते. तसेच महापालिकेचे कर्मचारी काम करत नाहीत केवळ राज्य शासनाचेच कर्मचारी काम करतात, अशी भावनाही प्रशासनाने अनेकदा व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सेवानिवृत्ती घेतलेल्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत का सामावून घेतले? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...