आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेसमोर निर्माण झाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिका प्रशासनाला येत्या काही दिवसांत डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न भेडसावणार आहे. नायगाव परिसरातील डंपिंग ग्राऊंड अपुरे पडत असल्याने रेल्वेच्या जागेतही कचरा टाकला जात आहे. खंडवा मार्गाच्या रुंदी करणाचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याने रेल्वेने या जागेत कचरा टाकण्यास मनाई केली आहे. या अनुषंगाने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त अजय लहाने यांची भेट घेऊन या प्रकाराची माहिती दिली.

शहरात दररोज निर्माण होणारा कचरा नायगाव परिसरातील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. डंपिंग ग्राऊंडलगत खंडवा रेल्वे मार्ग गेलेला आहे. डंपिंग ग्राऊंड परिसरात काही नागरिकांनी झोपड्या उभारल्या आहेत. त्यामुळेच आता कचरा टाकण्यास ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातून आणलेला कचरा रेल्वेच्या जागेतही टाकला जात आहे.

या मार्गाचे रुंदीकरण केले जाणार असल्याने रेल्वे विभागाने रुळालगतची जागाही ताब्यात घेतली आहे. परिणामी, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन रेल्वेच्या जागेत कचरा टाकण्याची मागणी केली. आयुक्तांनी संबंधितांना तशा सूचना देऊन सायंकाळी या जागेची पाहणी केली.

विद्यमान डंपिंग ग्राऊंडची जागा ही आता शहरात आली आहे, तर दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यातही वाढ झाली आहे. यापूर्वी भोर गावालगतची जागा डंपिंग ग्राऊंडसाठी निश्चित केली होती. मात्र, यास ग्रामस्थांनी विरोध केला असून, ही जागा नदीलगत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही या ठिकाणी कचरा टाकता येत नाही. त्यामुळेच येत्या काही दिवसांत कचरा कुठे टाकावा? हा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण होणार आहे.

प्रशासनाने जागेचा शोध सुरू केला
प्रशासनानेयापूर्वीचजागेचा शोध सुरू केला आहे. आता महापालिकेची हद्दवाढ लक्षात घेऊनच डंपिंग ग्राऊंडसाठी जागा निश्चित करावी लागणार आहे. या अनुषंगाने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.'' अजय लहाने, आयुक्त,महापालिका.
बातम्या आणखी आहेत...