आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Opportunities Of Water Reservation In The Morna Project

उर्ध्व मोर्णा प्रकल्पामध्ये पाणी आरक्षणाची मनपाला संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील खारपाणपट्टा, महापालिकेची होणारी हद्दवाढ, भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि भूमिगत गटार योजना कार्यान्वित झाल्यानंतर दरडोई पाणीपुरवठ्यात वाढ करावी लागणार आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील आरक्षित पाण्याची पूर्ण उचल केली तरी पाण्याची गरज भासणार आहे. वान प्रकल्पाने शहरासाठी पाणी आरक्षणास दिलेला नकार या बाबी लक्षात घेता महापालिकेला मेडशीजवळील उर्ध्व मोर्णा प्रकल्पात शहरासाठी पाणी आरक्षित केल्यास पाणीटंचाईपासून शहराला मुक्ती मिळण्यास मदत होणार आहे.
सन १९७१ ला अस्तित्वात आलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात अकोला शहरासाठी १९७३ ला २४.०३ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. या आरक्षणात आता कोणतीही वाढ होणार नाही. पूर्वी आरक्षित पाण्यापैकी १२ ते १५ दलघमी पाण्याची उचल वर्षाकाठी केली जात होती. मात्र, आता २० दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली जाते. मोर्णा प्रकल्पात पाच दलघमी पाणी आरक्षण पुन्हा मंजूर झाले तरी २९ दशलक्ष घनमीटर पाण्याचीच सोय होणार आहे. तरी चार दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज भासणार आहे. ही गरज उर्ध्व मोर्णा प्रकल्पातून पूर्ण करता येणे शक्य आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, महापालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

भूमिगतसुरू झाल्यानंतर दलघमी अधिक लागणार
शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास दरडोई १३५ लीटर पाणीपुरवठा करावा लागणार आहे. १३५ दरडोई पाणीपुरवठा करावा लागल्यास महिन्याकाठी २.४५, तर वर्षाकाठी २९.४० दलघमी पाण्याची गरज भासणार आहे. दलघमी पाण्याची उचल केली जाते. मोर्णा प्रकल्पात पाच दलघमी पाणी आरक्षण पुन्हा मंजूर झाले तरी २९ दलघमी पाण्याचीच सोय होणार आहे.

हद्दवाढीनंतर दलघमीची गरज
मनपाची हद्दवाढ करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. मनपा क्षेत्रात २१ गावांचा समावेश होणार आहे. यामुळे एक लाख हजाराने लोकसंख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे सहा लाख सात हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी वर्षाकाठी ३२.७६ दलघमी पाणी लागणार आहे.

तूर्तास दलघमीची कमतरता
महापालिका तूर्तास दरडोई दर दिवशी १०० लीटर पाण्याचा पुरवठा करत आहे. निकषाप्रमाणे दरडोई १५० लीटर पाणीपुरवठा केल्यास महापालिकेला महिन्याकाठी २.२५ दलघमी, तर वर्षाकाठी २७ दलघमी पाण्याची गरज भासते. काटेपूर्णा प्रकल्पात २४.०३ पाणी आरक्षित आहे.

पाणीवाटपाचे शासनाचे निकष
शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी मोर्णा नदीवर मेडशीजवळ उर्ध्व मोर्णा प्रकल्प बांधण्यात आला आहे. याच योजनेतील निम्न मोर्णा प्रकल्पाचे काम रखडले आहे. उर्ध्व मोर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता १२.८४ दशलक्ष घनमीटर आहे. महापालिकेने जिगाव प्रकल्पातही पाणी आरक्षणाची मागणी केली आहे. परंतु, हा प्रकल्प पूर्ण होण्यास अनेक वर्षे वाट पाहावी लागणार आहे. तसेच जिगाव आणि अकोला शहराचे अंतर लक्षात घेता, जिगाव प्रकल्पातील पाण्याची उचल करणेही जिकरीचे काम आहे. त्यामुळेच अकोल्यापासून ५० किलोमीटर अंतरावरील उर्ध्व मोर्णा प्रकल्पात भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाणी आरक्षित करणे गरजेचे आहे. यासाठी खासदार, आमदार, महापालिकेतील लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पुढारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे.