आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व झोनमध्ये सहा हजार मालमत्तांना दिले क्रमांक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपाच्या मालमत्ता करात कोट्यवधीने वाढ करणाऱ्या जीआयएस पद्धतीच्या मालमत्ता मोजणीच्या पहिल्या टप्प्यातील मालमत्तांच्या नोंदणीला पूर्व झोनपासून प्रारंभ झाला. आतापर्यंत सहा हजार मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर सोमवारपासून दक्षिण झोनमधील मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम सुरू होत आहे.
मनपाचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, मनपा अस्तित्वात आल्यापासून मालमत्तांची नोंदणी रिअसेसमेन्ट झाले नाही. त्यामुळेच हजारो मालमत्तांची नोंद झाल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. या अनुषंगानेच सात वर्षांपूर्वी स्व. पप्पू शर्मा स्थायी समितीचे सभापती असताना त्यांनी जीआयएस पद्धतीने मालमत्तांची नोंदणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, प्रत्यक्षात मोजणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे मागील सात वर्षांपासून हे काम रखडले होते. आता यावर्षी जीआयएस पद्धतीने मालमत्तांचे मोजमाप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला होता. विहित कालावधीत स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने कंत्राटदाराने काम सुरू केले नव्हते. अखेर स्थायी समितीने प्रशासनाने दिलेल्या आदेशाला कार्यात्तर मंजुरी दिल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने काम सुरू केले आहे.

पूर्व झोनपासून पहिल्या टप्प्यात मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत सहा हजार मालमत्तांना क्रमांक देण्यात आले असून, सोमवारपासून दक्षिण झोनमधील मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम सुरू होत आहे.यानंतर येत्या काही दिवसात ४० टीम मालमत्तांच्या मोजणीच्या कामाला लागणार आहेत. एका टीममध्ये तीन जणांचा समावेश राहील. हद्दवाढीपूर्वीच्या क्षेत्रफळातील मालमत्तांच्या मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील मालमत्तांची नोंदणी आणि मोजणी केली जाणार आहे.

कोट्यवधी रुपयाने महसूल वाढणार : महापालिकामालमत्ता कर विभागाच्या दप्तरी केवळ ७६ हजार मालमत्तांची नोंद आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोजणीच्या वेळी ही संख्या ९६ हजारावर गेली होती. यात आणखी पाच ते दहा हजाराने वाढ अपेक्षित आहे, तर महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या २४ गावात ४० हजार मालमत्तांची नोंद आहे. यातही वाढ होण्याची शक्यता असल्याने मालमत्तांची संख्या एक लाख ७५ हजाराच्या पेक्षा अधिक जाण्याची शक्यता असल्याने मालमत्ता करातून महापालिकेला ५० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
बातम्या आणखी आहेत...