आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्तेच्या करातून ४१ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मालमत्ता करातून ४१ कोटी ५९ लाख रुपये वसुलीचे लक्ष्य महापालिका प्रशासनाने निश्चित केले आहे. शहरातील दीड लाख मालमत्ता धारकांकडून कर वसूल केल्या जाणार आहे. निर्धारित केलेले लक्ष्य साध्य करता यावे म्हणून महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.
महापालिका अंतर्गत एक लाख ५६ हजारच्या आसपास मालमत्ता आहे. या इमारतींवर महापालिकेकडून मालमत्ता कर आकारणी केली जाते. आगामी आर्थिक वर्षात प्रशासनाने ४१ कोटी ५९ लाख रुपयांचा कर वसुल करणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या पाच झोन कार्यालय अंतर्गत वार्ड लिपीकाकडून ही कर वसुली केली जाते. शिवाय पेमेंट गेट-वे तसेच ऑनलाइन सुविधेने देखील मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. ३१ डिसेंबर पूर्वी मालमत्ता कराचे उद्दीष्ट पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जकात आणि स्थानिक संस्था कर (एलबीटी) समाप्त झाल्यानंतर मालमत्ता कर महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख साधन झाले आहे. मात्र महापालिका क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता मालमत्ता करातून प्राप्त होणारे उत्पन्न अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. शहरात इमारतींचे निर्माण कार्य करताना महापालिका प्रशासनाकडून परवानगी देखील घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्याचा थेट परिणाम मालमत्ता करावर होत अाहे.

इमारतीचे बांधकाम केल्यानंतर त्यावर मालमत्ता कराची आकारणी केली जाते. मालमत्ता कर आकारणी करताना बांधकामाचे क्षेत्र कमी दाखविण्याचे प्रकार देखील असल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. असे अनेक प्रकरणे महापालिकेत उघडकीस आली आहेत, त्यामुळे याचा गंध मालमत्ता कर विभागात देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील संपूर्ण मालमत्तांचे स्कॅनींग करण्याची गरज निर्माण झाली आहे. मालमत्ता करात वाढ करता यावी म्हणून दोन वर्षांपूर्वी इमारतींचे स्कॅनींग करण्यात आले, मात्र मालमत्ता करात काेणतीही वाढ करण्यात आली नाही.

करवसुलीचे लक्ष्य
प्रभाग क्रमांक नाव मागणी
प्रभाग क्रमांक उत्तर झोन ९,७३,०७,६५८
प्रभाग क्रमांक मध्य झोन १२,८४,३५,०००
प्रभाग क्रमांक पूर्व झोन ३,५५,१०,७३८
प्रभाग क्रमांक दक्षिण झोन ११,८९,९६,८५६
प्रभाग क्रमांक पश्चिम झोन ३,५६,६२,१३५

प्रक्रिया केली सुरू
^मालमत्ता कर वसुलीची प्रक्रिया प्रशासनाकडून आरंभ करण्यात आली आहे. आर्थिक वर्षात ४१ कोटी ५९ लाख रुपयांचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. कर वसुली करण्यासाठी नागरिकांना डिमांड नोट पाठविण्यात आली आहे. नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करावा. महेश देशमुख, कर निर्धारक कर संकलन अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...