आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal School In Students Notebook Distribution

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- मनपामराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मधील दहावीतील विद्यार्थ्यांना आठ सप्टेंबरला मायबोली कोचिंग क्लासेसच्या वतीने सर्व विषयांच्या नोटबुकचे वाटप केले. कोणतीही खासगी शिकवणी लावता दहावीची परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी दिव्य मराठीने सुरू केलेल्या महाअभियानाला प्रभात किड्स आणि मायबोली कोचिंग क्लासेसने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सामाजिक दायित्वाचा परिचय देत, इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेससमोर आदर्श निर्माण केला आहे.
सर्व सुविधा असलेल्या खासगी शाळांशी आव्हान देत उभ्या राहिलेल्या मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळावे, यासाठी दिव्य मराठीने महाअभियान राबवले. या अभियानाला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभात किड्सने या विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन २६’ सुरू केले. या मिशन तसेच अभियानात मायबोली कोचिंग क्लासनेही मायेची साथ दिली. मायबोली कोचिंग क्लासने दिलेल्या अभिवचनाची आठ सप्टेंबरला पूर्तता केली. मायबोलीच्या सीमा बक्षी यांनी दहावीतील विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या नोटबुक (गाइड) उपलब्ध करून दिल्या, तर रेणुका माता मित्र मंडळाने विद्यार्थ्यांना कंपासचे वाटप केले. या वेळी सीमा बक्षी, प्राजक्ता जोशी, अजय फाले, प्रभातचे प्रदीप अवचार, रेणुका माता मित्र मंडळाचे नितीन देशमुख, अभय कुटे आदी उपस्थित होते.

मनपाअधिकाऱ्यांचाही पुढाकार : मनपाबांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनीही या विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. सराव परीक्षेत पहिल्या येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याचा निर्णय या अधिकाऱ्यांनी घेतला असून, त्याचबरोबर इतर पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
महापालिका शाळा क्रमांक २६ मधील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात अाले.

गुरुवारी होणार पहिली टेस्ट : आतापर्यंतझालेल्या कोर्सवर आधारित पहिली टेस्ट गुरुवारी घेतली जाणार आहे. या टेस्टनंतर विद्यार्थ्यांचे गुणवत्तानिहाय ग्रुप केले जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा एक महिन्याने टेस्ट घेतली जाणार आहे.
सहकारातून समाधान